Home लेटेस्ट मराठी न्यूज सलग तिसऱ्या दिवशी अपघात, घरी पोहचण्याआधीच 23 लोकांचा प्रवास ठरला शेवटचा |...

सलग तिसऱ्या दिवशी अपघात, घरी पोहचण्याआधीच 23 लोकांचा प्रवास ठरला शेवटचा | National


फरिदाबाद इथून मजुरांना घेऊन हा ट्रक जात असताना भीषण अपघात झाला.

औरेया, 16 मे : देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांचं काम बंद आहे. हातात पैसे नसल्यानं मजूर आपल्या मूळ गावी परतत असताना सलग तिसऱ्या दिवशी मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. वेगवेगळ्या राज्यात गेलेले कामगार रस्त्याने आपल्या घरी परतत आहेत. पण त्यादरम्यान सलग तीन दिवसांपासून होणाऱ्या अपघातांच्या बातमीनं सर्वच हैराण झाले आहेत. मध्य प्रदेशातील गुना येथे नुकताच झालेल्या भीषण रस्ता अपघातानंतर शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील औरैया येथे भीषण रस्ता अपघात झाला. फरिदाबाद इथून 81 मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि ट्रेलची जोरदार धडक झाली.

या अपघातात जवळपास 23 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 20 प्रवासी जखमी झाले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. ट्रक खाली अडकलेल्या मजुरांचे मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे. तर जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हे सर्व मजूर फरिदाबादहून गोरखपूरकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. जखमी मजुरांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. काही जखमी मजुरांची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगण्यात आलं आहे. मिहौली राष्ट्रीय महामार्गावर सामान भरलेल्या ट्रकनं फरिदाबादहून 81 मजुरांना घेऊन उभे असलेल्या ट्रोलरला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की ट्रक आणि ट्रेलर दोन्ही उलटे झाले. या अपघातात 23 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हे वाचा-IAS ला सलाम! लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात एकाही मजूराला, गरीबाला उपाशी ठेवलं नाही

हे वाचा-VIDEO : श्रावणबाळ! 11 वर्षांच्या मुलानं लॉकडाऊनमध्ये आई-बाबांना सायकलवरून नेलं

हे वाचा-राफेल लढाऊ विमान देशात होणार दाखल, भारताची हवाई क्षमता वाढणार

संपादन- क्रांती कानेटकर

First Published: May 16, 2020 07:28 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular