Home Uncategorised सत्यजित दुबे: करोना- संजय दत्तच्या मदतीने अभिनेत्याने मिळवला आईसाठी बेड - satyajeet...

सत्यजित दुबे: करोना- संजय दत्तच्या मदतीने अभिनेत्याने मिळवला आईसाठी बेड – satyajeet dubey mother corona positive take help from sanjay dutt


मुंबई- बॉलिवूड अभिनेता सत्यजीत दुबेची आई करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. सत्यजीतची आई ५४ वर्षीय आहे. ताप आणि अंग दुखीमुळे त्यांना इस्पितळात नेण्यात आलं होतं. त्यानंतर त्या करोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. स्वतः सत्यजीतने सोशल मीडियावर चाहत्यांना ही बातमी दिली. सध्या त्याची आई एका इस्पितळात आयसोलेशन वॉर्डमध्ये आहे.

करोनासंबंधी ट्वीटमुळे पुरते फसले परेश रावल!

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केली करोना टेस्ट-

रिपोर्टनुसार, सत्यजीतच्या आईला मायग्रेनचा त्रास होता. १० दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली. त्यांना थंडी आणि ताप याच्यासह अंगदुखीचा त्रास सुरू झाला. यानंतर डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांची करोना टेस्ट करण्यात आली असता त्या पॉझिटिव्ह निघाल्या. इस्पितळात भरती करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही उपाय नव्हता. मात्र यासाठीही त्याला संघर्ष करावा लागला.

आर्थिक संकट आणि डिप्रेशनमुळे अभिनेत्याने केली आत्महत्या

घ्यावी लागली स्टार्सची मदत-

सत्यजीत म्हणाला की, इस्पितळात आईला भरती करण्यासाठी त्याला अभिनेता असल्याचा फायदा उचलावा लागला. याबद्दल सांगताना सत्यजीत फार भावुक झाला. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझ्यासाठी किंवा कोणासाठीही आई सर्वकाही असतं. तिला सर्व सुविधा मिळाव्यात असं प्रत्येक मुलाला वाटत असतं. माझ्या जागी कोणताही सामान्य मुलगा असता तर त्याला एक बेड मिळणं जवळपास अशक्य असतं. देवाचे आभार की मी अशा फिल्डमध्ये आहे जिथे लोकांच्या मदतीने मी आईसाठी एका बेडची सोय करू शकलो. मला काही लोकांना फोन करावा लागला आणि त्यांची मदत घ्यावी लागली. पण सर्वसामान्यांसाठी हे फार कठीण आहे.’

सलमान खान फिल्म्स विरोधात तक्रार दाखल, अभिनेत्याने केले गंभीर आरोप


या सेलिब्रिटींची घेतली मदत-

सत्यजीत दुबे पुढे म्हणाला की, संजय दत्त, अली फजल आणि टिस्का चोप्रा यांना फोन केल्यानंतर त्याला मदत मिळाली. सध्या सत्यजीत आणि त्याची बहीण घरातच आयसोलेट आहे. यावेळी सत्यजीतने पोस्टमध्ये मुंबई पोलीस, डॉक्टर आणि बीएमसी कर्मचारी यांचेही आभार मानले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular