Home लेटेस्ट मराठी न्यूज शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली मोठी घोषणा | News

शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली मोठी घोषणा | News


माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफ

मुंबई, 8 नोव्हेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांनी दिवाळी सणाच्या (Diwali Festival) पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी 1.30 वाजता फेसबुक आणि युट्यूबवर व्हिडीओ लाईव्ह जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातीत शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मोठी घोषणा केली आहे.

‘बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना’ राज्यात राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफ करण्यात येणार आहे.

हेही वाचा…’मातोश्री’बाहेर पडले नाही, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जोरदार उत्तर

अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. यासाठी 10 हजार कोटींची अर्थसहाय्य राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

‘विकेल तेच पिकेल’मुळे शेतकऱ्यांना लाभ

आमच्या नव्या अभियानास चांगला प्रतिसाद आहे. ‘विकेल तेच पिकेल’ असं याचं नाव आहे. शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल आणि त्यातून शेतकरी चिंतामुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

याबरोबरच राज्यातील तूर, कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. जिथे खरेदी केंद्रं सुरु झालेले नाहीत. त्या ठिकाणीही लवकरच शेतीमालाची खरेदी केली जाईल असेही ते म्हणाले.

राज्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीर उद्धव ठाकरेंनी जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी मुंबई, राज्यात कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवता आल्याचे ते म्हणाले. पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी लागेल, असं त्यांनी सांगितलं.

मिठागरात मिठाचा खडा टाकू नका…

मुंबई मेट्रोची कारशेडला कांजूरमार्गला करण्यावरुन राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. कांजूरमार्गची जमीन मिठागराची आहे म्हणणाऱ्यांनी मिठागरात मिठाचा खडा टाकू नका, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.

मुंबईकरांच्या हितासाठी कोणत्याही टीकेची पर्वा न करता काम करणारच, असा निर्धारही उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला. काहीजण ती जमीन मिठागराची आहे, असं म्हणत आहेत, पण ती जर मिठागराची जमीन आहे, असे म्हणणाऱ्यांना एक कळत तुम्ही मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकत आहात. आरेची कारशेड कांजूरमार्गला नेली त्यावर सर्व उत्तर आपल्याकडे आहेत. हे सर्व जे टीका करतात त्यांना समर्पक उत्तर देऊ, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा..दिनानाथ नाट्यगृहाच्या डागडुजीमध्ये 16 कोटींचा भ्रष्टाचार; अमेय खोपकर यांचा आरोप

दिवाळीनंतर धार्मिक स्थळं उघडणार

राज्यातील धार्मिकस्थळं दिवाळीनंतर उघडणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळीनंतर धार्मिकस्थळं उघडण्यासाठी नियमावली तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मंदिरं उघडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांवर गंडांतर येऊ नये म्हणून सावध पावलं टाकत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.


Published by:
Sandip Parolekar


First published:
November 8, 2020, 3:14 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular