Home शहरं Mumbai 'विदेशातून ऑपरेट झालीत ठाकरे सरकारची बदनामी करणारे ती दीड लाख Twitter अकाउंट्स'...

‘विदेशातून ऑपरेट झालीत ठाकरे सरकारची बदनामी करणारे ती दीड लाख Twitter अकाउंट्स’ | News


आक्षेपार्ह माहिती कुठून पसरविली गेली याचा शोध लागू नये यासाठी अशा प्रकारची अकाउंट्स निर्माण केली जातात असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

मुंबई 03 नोव्हेंबर: सुशांतसिंह राजपूत (sushant singh Rajput) याच्या मृत्यू नंतर राज्यातल्या ठाकरे सरकारविरुद्ध आरोपांची राळ उठली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली गेली. त्याबद्दल आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) धक्कादायक खुलासा केला आहे. राज्य सरकारची बदनामी करणारी, चुकीची, खोटी, बदनामीकारक माहिती पसरविणारी तब्बल दीड लाख Twitter अकाउंट्स आहेत असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. या अकाउंट्सवरून मुंबई पोलिसांनावरही चिखलफेक करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

विविध देशांमधून हे अकाउंट्स ऑपरेट केले गेले आहेत. आक्षेपार्ह माहिती कुठून पसरविली गेली याचा शोध लागू नये यासाठी अशा प्रकारची अकाउंट्स निर्माण केली जातात असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांच्या सायबर सेलने केलेल्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. यातली 80 टक्के अकाउंट्स ही संशयास्पद आहेत. या अकाउंट्सवरून अत्यंत आक्षेपार्ह ट्विट्स केल्या गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. बोट्सच्या माध्यमातून हे ट्विट्स केल्या गेल्याचही आढळून आलं आहे. विविध देशांमधून हे अकाउंट्स ऑपरेट केल्या केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. याबद्दल पोलिसांनी या आधाही माहिती दिली होती.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत पद्धतशीरपणे बदनामी करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेनेही केला होता. महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस यांच्या विरुद्ध या माध्यमातून बदनामी करणारी माहिती पसरविण्यात आली आल्याचं शिवसेनेने म्हटलं होतं.


Published by:
Ajay Kautikwar


First published:
November 3, 2020, 10:36 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular