Home लेटेस्ट मराठी न्यूज लॉकडाऊनमध्ये Sex buddy शोधा; या देशाच्या सरकारनं दिला अजब सल्ला singles to...

लॉकडाऊनमध्ये Sex buddy शोधा; या देशाच्या सरकारनं दिला अजब सल्ला singles to find sex buddies to cure lockdown lonelines netherland mhpl | Coronavirus-latest-news


लॉकडाऊनमधील (lockdown) एकटेपणा दूर करण्यासाठी असा सल्ला देण्यात आला आहे.

अॅमस्टरडॅम, 17 मे : कोरोनाव्हायरसमुळे (CoronaVirus) भारतात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown)आता 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.  घरातल्या घरात राहिल्याने लोकांना मानसिक आरोग्याच्या समस्या बळावत आहेत. स्ट्रेस वाढतो आहे. मानसिक आरोग्य राखण्यासाठी भारतातील लोकं घरात व्यायाम, योगा करत आहेत, आवडीचे छंद जोपासत आहेत. तर दुसरीकडे काही देशांमध्ये मात्र अजब सल्ले दिले जात आहे.

नेदरलँडमध्ये लॉकडाऊनदरम्यान नागरिकांना सेक्स पार्टनर (sex buddy) शोधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बीबीसी रिपोर्टनुसार, आरोग्य मंत्राल्यानं नवीन गाइडलाइन्स जारी केलेत, त्यानुसार आपला एकटेपणा दूर करण्यासाठी एकटी राहणारी व्यक्ती सोबतीला दुसरी व्यक्ती शोधू शकते. मात्र जर दोघांपैकी एकामध्येही कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आलीत, तर त्यांनी सेक्स करू नये. असंही स्पष्ट केलं आहे.

हे वाचा – कोरोना लॉकडाऊनचा परिणाम; माणसंच नाही तर माशांनाही आलं डिप्रेशन

तुम्ही जितक्या जास्त व्यक्तींना भेटाल तितका व्हायरस पसरण्याचा धोका वाढतो. या एकाच व्यक्तीला नेहमी भेटा, जेणेकरून तुम्ही आजारापासून दूर राहाल असं या गाइडलाइनमध्ये म्हटलं आहे.

नेदरलँडमध्ये 23 मार्चपासून लॉकडाऊन आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत इथला लॉकडाऊन तितका कडक नाही. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत एखादा छोटासा कार्यक्रम करण्यास परवानगी आहे. जर व्हायरवर नियंत्रण मिळालं तर इतर युरोपीयन देशांप्रमाणे नेदरलँडही लॉकडाऊन शिथील करण्याच्या तयारीत आहे.

हे वाचा – तुम्हालाही बोलताना त्रास होतोय का? दुर्लक्ष करू नका, असू शकतं Corona चं लक्षण

दरम्यान याआधी न्यूयॉर्कच्या आरोग्य विभागाने (NYC health department) असा सल्ला दिला होता. लॉकडाऊनमुळे लोकांमधील वाढता स्ट्रेस कमी करण्यासाठी  विशेष गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये लोकांच्या सेक्स लाइफवर विशेष लक्ष देण्यात आलं होतं. न्यूयॉर्क पोस्टने याबाबत वृत्त दिलं होतं. स्ट्रेस दूर करण्यासाठी सुरक्षित सेक्स आणि हस्तमैथुनची मदत घेऊ शकतात असं, असा सल्ला न्यूयॉर्क हेल्थ डिपार्टमेंटने दिला आहे.

शास्त्रज्ञांना स्पर्ममध्ये सापडला कोरोना

नेदरलँड, न्यूयॉर्कमध्ये जरी सेक्सला परवानगी दिली जात असली, तर चीनमध्ये मात्र शारीरिक संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. चीनच्या शास्त्रज्ञांना पुरुषांच्या स्पर्ममध्ये कोरोना आढळून आल्यानं अशा सूचना देण्यात आल्यात. शांगक्यू या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 38 पुरुषांना कोरोनाही लक्षणे नव्हती. यांपैकी 6 जणांच्या स्पर्ममध्ये कोरोनाव्हायरस आढळून आला. या 6 रुग्णांना याआधी कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते निरोगी झाले होते. मात्र काही दिवसांनंतर त्यांच्या स्पर्ममध्ये पुन्हा कोरोना आढळून आला. कोरोना संक्रमित पुरुषांसोबत सेक्स केल्यानंतर व्हायरस पसरण्याचा धोका असू शकतो, अशी शक्यता चीनमधील तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

हे वाचा – सावधान! आता SEX ही सुरक्षित नाही?, शास्त्रज्ञांना स्पर्ममध्ये सापडला कोरोना

First Published: May 17, 2020 11:02 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular