Home लेटेस्ट मराठी न्यूज लेकरांसाठी बाप बनला 'श्रावणबाळ', पोलिसांनी अडवलं आणि केली मदत lockdown migrant worker...

लेकरांसाठी बाप बनला ‘श्रावणबाळ’, पोलिसांनी अडवलं आणि केली मदत lockdown migrant worker with family police stopped and help them mhsy | National


लॉकडाऊनमध्ये परराज्यात अडकलेले मजूर त्यांच्या घरी जाण्यासाठी पायी किंवा मिळेल त्या वाहनाचा वापर करत आहेत. या मजुरांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रायपूर, 16 मे : कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव पर्याय सध्या आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र या लॉकडाऊमुळे परराज्यात अनेक मजूर अडकले आहेत. आता काम नसल्यामुळे पैसेही नाहीत अशा परिस्थितीत खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे मजूर गावाकडे चालत किंवा मिळेल त्या वाहनाने निघाले आहेत. अशा मजुरांचे हृदयद्रावक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. छत्तीसगढ इथं करनूलमधील दोन प्रवासी मजूर मुलांसह घरी चालत निघाले होते. यात एका बापाने लेकरांना कावडीमध्ये घेतलं होतं. हे दृश्य पोलिसांनी पाहताच त्या मजुरांना गावी जाण्यासाठी त्यांनी मदत केली.

आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील अडोनी पोलिस स्टेशनमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचारी जगदीश कुमार यांनी मजुरांना मोठी मदत केली. त्यांनी फक्त वाहनाचीच व्यवस्था केली असं नाही तर जेवण आणि थांबण्याची सोयसुद्धा केली. यावेळी जगदीश कुमार यांच्यासोबत आणखी एक सहकारी होता.

हे वाचा : एक रुपयात इडली देणाऱ्या अम्मांना शेफ विकास खन्नांनी दिलं गिफ्ट

कॉन्स्टेबलने मजुरांना त्यांच्या घरी पायी जात असलेलं पाहिलं. याआधी ते कूरनूल इथल्या यमिगनू शहरात दिसले होते. त्यांना या अवस्थेत पाहुन जगदीश कुमार यांनी कुटुंबाला तिथंच थांबवलं. त्यानंतर मजुरांसाठी खाण्याची व्यवस्था केली. तसंच त्यांची राहण्याचीही सोय केली.

हे वाचा : डेव्हिड वॉर्नरचा ‘बाहुबली’ अवतार, पण बाबाच्या व्हिडिओत लेकीनं मारली बाजी

खाण्याची आणि राहण्याची सोय झाल्यानंतर त्यांना गावी कसं पोहोचवता येईल यासाठी जगदीश कुमार यांनी हालचाली सुरु केल्या. शेवटी एक गाडीही त्यांना मिळाली. दोन्ही कॉन्स्टेबलनी केलेल्या या मदतीचं कौतुक केलं जात आहे.

हे वाचा : 8 लाख लोकांची केली हत्या, 25 वर्षांनी आरोपीला झाली अटक

First Published: May 16, 2020 08:06 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular