Home लेटेस्ट मराठी न्यूज लाऊडस्पीकरवरुन अजान देणं हा इस्लाम धर्माचा भाग नाही - अलाहाबाद उच्च न्यायालय...

लाऊडस्पीकरवरुन अजान देणं हा इस्लाम धर्माचा भाग नाही – अलाहाबाद उच्च न्यायालय azan is part of islam but azan from speaker in not its part said by allahabad high court mhrd | News


मशिदीमध्ये अजान देण्यासाठी कोर्टाकडून परवाणगी देण्यात आली. मात्र, यावेळी लाऊडस्पीकर किंवा कोणत्याही यंत्राचा वापर केला जाऊ शकत नाही हे कोर्टानं स्पष्ट केलं आहे

प्रयागराज, 16 मे : अलाहाबाद उच्च न्यायालयानं मशिदीतून अजान देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मशिदीमध्ये अजान देण्यासाठी कोर्टाकडून परवाणगी देण्यात आली. मात्र, यावेळी लाऊडस्पीकर किंवा कोणत्याही यंत्राचा वापर केला जाऊ शकत नाही हे कोर्टानं स्पष्ट केलं आहे. लाऊडस्पीकर लावणं किंवा इतर यंत्राचा वापर करणं हा इस्लाम धार्माचा भाग नाही असं कोर्टानं म्हटलं आहे.

गाझीपूरचे खासदार अफजल अन्सारी आणि फर्रुखाबादचे सय्यद मोहम्मद फैजल यांच्या याचिका निकाली काढताना न्यायमूर्ती शशिकांत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. कोरोना साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना आणि एका ठिकाणी एकत्र येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे लाऊडस्पीकर लावून अजान देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

‘मशिदीचा सांभाळ करणारी व्यक्ती कोणत्याही यंत्राचा वापर करताही अजान देऊ शकते. यासोबत प्रशासनाने करोनाचा फैलाव रोखण्याच्या बहाण्याने यामध्ये कोणतीही अडचण निर्माण करु नये असा आदेश दिला जात आहे. जोपर्यंत नियमांचं उल्लंघन केलं जात नाही तोपर्यंत प्रशासन यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करु शकत नाही’ असं खंडपीठानं आपल्या निर्णयात म्हटलं आहे.

गाझीपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मशिदींमधून लाऊडस्पीकर वापरण्यास बंदी घालण्यासाठी तोंडी सूचना दिल्या होत्या. यागी गाजीपूर इथल्या बहुजन समाज पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांनी याला विरोध केला. धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करून मस्जिदातून लाऊडस्पीकरला परवानगी देण्यास नकार देऊन त्यांनी रमजान महिन्यात हस्तक्षेप करण्याची मागणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना केली होती. सरन्यायाधीश गोविंद माथूर यांनी जनहित याचिकेचा फॉर्म स्वीकारून सरकारची बाजू मागितली होती. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता.

जेव्हा लाऊडस्पीकर नव्हता तेव्हाही अजान होत होती

अलाहाबाद उच्च न्यायालयानं निकालामध्ये लाऊडस्पीकरनं अजानवरील बंदी बरोबर असल्याचं स्पष्ट केलं. लाऊडस्पीकर नसतानाही अजान होत होती. तरीही लोक मशिदीत प्रार्थना करण्यासाठी एकत्र येत होते असं कोर्टानं म्हटलं आहे.

संपादन – रेणुका धायबर

First Published: May 16, 2020 08:24 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular