Home लेटेस्ट मराठी न्यूज लहान भावानेच मोठ्या भावाच्या छातीत खुपसला चाकू, हत्येनं परिसरात खळबळ Murder of...

लहान भावानेच मोठ्या भावाच्या छातीत खुपसला चाकू, हत्येनं परिसरात खळबळ Murder of elder brother by younger brother in Dhule updates mhas | Crime


मोठ्या भावावर लहान भावाने चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

धुळे, 2 नोव्हेंबर : वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मोठ्या भावाचा सख्ख्या भावानेच चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना धुळे जिल्ह्यातील मुकटी गावात घडली आहे. नातेवाईकांमध्ये सांडपाण्यावरुन वाद झाल्यानंतर तो मिटविण्यासाठी गेलेल्या मोठ्या भावावर लहान भावाने चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

यात धनराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी झाले आहेत. धनराज पाटील यांच्या लहान भावाचा शेजारील नातेवाईकांशी सांडपाण्यावरून वाद झाला होता. दरम्यान हा वाद मिटविण्यासाठी सायंकाळी धनराज पाटील आणि कुटुंबातील काही जण एकत्र आले. त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत विकोपाला जाणारा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटण्याऐवजी वाढला.

हेही वाचा – रस्त्यात गाडी अडवली अन् तलवारीने वार केले वार, सराफांकडून 60 लाख रुपयांचा ऐवज पळवला

यावेळी चाकूचा सर्रासपणे वापर झाल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. विकोपाला जाणारा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील सदस्यांवरच दादा पाटील याने चाकूने हल्ला केला. यात धनराज पाटील यांच्या छातीत चाकू भोसकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित दादा दौलत पाटील याला अटक केली आहे. दरम्यान सख्ख्या भावानेच चाकू भोसकून खून केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.


Published by:
Akshay Shitole


First published:
November 2, 2020, 10:05 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular