Home लेटेस्ट मराठी न्यूज रेल्वेचे वेळापत्रक ते LPG गॅसचे दर यामध्ये होणार बदल, 1 नोव्हेंबरपासून नवे...

रेल्वेचे वेळापत्रक ते LPG गॅसचे दर यामध्ये होणार बदल, 1 नोव्हेंबरपासून नवे नियम these 5 things will change from 1 november 2020 know all details mhjb | News


1 नोव्हेंबर 2020 पासून देशभरात काही नवीन नियम लागू होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या दररोजच्या जीवनावर होणरा आहे. गॅस सिलेंडर बुकिंगपासून बँक चार्जपर्यंत विविध नियम समाविष्ट आहेत.

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : 1 नोव्हेंबर 2020  (1st November 2020) पासून देशभरात काही नवीन नियम लागू होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या दररोजच्या जीवनावर होणरा आहे. गॅस सिलेंडर बुकिंगपासून बँक चार्जपर्यंत विविध नियम समाविष्ट आहेत. याशिवाय भारतीय रेल्वे देखील 1 नोव्हेंबरपासून वेळापत्रकात बदल करणार आहे. तुम्हाला हे सर्व नियम माहित असणे गरजेचे आहे, अन्यथा काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

1. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी द्यावा लागणार ओटीपी

सिलेंडरची डिलिव्हरी घेताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. या नवीन प्रणालीला DAC असे नाव देण्यात आले आहे, म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (Delivery Authentication Code). आता केवळ सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल. डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला हा कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल. तेल कंपन्या हा प्रयोग सुरुवातीला 100 स्मार्ट सिटीजमध्ये लागू करणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल

2. एक तारखेपासून BoB ग्राहकांना द्यावे लागेल शुल्क

बँकांमध्ये आता पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. BoB ने याची सुरुवात केली आहे. पुढील महिन्यापासून निश्चित मर्यादेनंतर पैसे काढल्यास शुल्क द्यावे लागणार आहे. 1 नोव्हेंबरपासून ज्यांचे कर्ज खाते आहे  त्यांना 3 वेळा पैसे काढून झाल्यानंतर, त्यानंतर कितीही वेळा पैसे काढताना 150 रुपये द्यावे लागतील.

(हे वाचा-Gold Price Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारलं सोनं, इथे वाचा नवे दर)

बचत खात्यासाठी तीन वेळा पैसे भरणे मोफत आहे, चौथ्या वेळेपासून 40 रुपये शुल्क आकारले जाईल. जनधन खातेधारकांना पैसे जमा करताना शुल्क नाही आहे पण मर्यादित ट्रान्झॅक्शननंतर पैसे काढण्यासाठी 100 रुपये द्यावे लागतील.

3. रेल्वेने बदलले वेळापत्रक

भारतीय रेल्वे संपूर्ण देशभरात धावणाऱ्या रेल्वेंचे वेळापत्रक बदलणार आहे. याआधी हे वेळापत्रक 1 ऑक्टोबरपासून बदलणार होते, मात्र आता ही डेडलाइन 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यानंतर 13 हजार पॅसेंजर्स आणि 7  हजार मालगाड्यांच्या वेळात बदल होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून देशात धावणाऱ्या 30 राजधान ट्रेन्सच्या वेळा देखील बदलणार आहेत.

4. Indane ने बदलला बुकिंग क्रमांक

तुम्ही जर इंडेनचे ग्राहक असाल तर तुम्ही जुन्या क्रमांकावरून आता एलपीजी गॅसचे बुकिंग करू शकणार नाही. इंडेनने त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर बुकिंगचा नवा क्रमांक पाठवला आहे. याआधी इंडियन ऑइलने अशी माहिती दिली होती की, घरगुती गॅस बुकिंगसाठी देशात वेगवेगळ्या सर्कलसाठी वेगवेगळे मोबाइल क्रमांक आहेत.

(हे वाचा-‘कॉमन मॅन’साठी खूशखबर! आता स्वस्त होणार कांदा, वाचा किती कमी होणार किंमत)

आता देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीने सर्वांसाठी एकच नंबर जारी केला आहे. इंडेनच्या देशभरातील ग्राहकांसाठी एलपीजी बुक करण्यासाठी 7718955555 या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस करावा लागेल.

5. बदलणार एलपीजी गॅसच्या किंमती

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल मार्केटिंग कंपन्या एलीपीजी सिलेंडरच्या नव्या किंमती जारी करतात. यानुसार किंमती वाढू देखील शकतात किंवा कमी सुद्धा होऊ शकतात. ऑक्टोबरमध्ये तेल मार्केटिंग कंपन्यांनी कमर्शिअल सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली होती.


Published by:
Janhavi Bhatkar


First published:
October 29, 2020, 8:43 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular