Home लेटेस्ट मराठी न्यूज राज्यपाल चांगली व्यक्ती, 'त्या' प्रस्तावाला विरोध करणार नाहीत; भुजबळांचा खोचक टोला |...

राज्यपाल चांगली व्यक्ती, ‘त्या’ प्रस्तावाला विरोध करणार नाहीत; भुजबळांचा खोचक टोला | News


काही पक्षांची नावेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांच्याकडे आली आहेत, छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

नाशिक, 6 नोव्हेंबर: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister chhagan bhujbal) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari ) यांना खोचक टोला लगावला आहे. राज्यपाल चांगली व्यक्ती आहे. ते राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नावांच्या प्रस्तावाला विरोध करणार नाहीत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. राज्यपालांकडे काही सदस्यांची नावे पाठवण्यात आली आहेत.

काही पक्षांची नावेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांच्याकडे आली आहेत, असा गौप्यस्फोट देखील छगन भुजबळ यांनी यावेळी केला आहे.

हेही वाचा…मुंबईती कोव्हिड सेंटरमध्ये माणुसकीला काळीमा, सुरक्षारक्षकाकडून महिलेचा विनयभंग

छगन भुजबळ म्हणाले, राज्यात दिवाळीत फटाक्यांवर बंदी नाही, मात्र फटाके न वाजवण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. फटाक्यांमधून निघणारा धूर कोरोनाबाधित रुग्णासाठी हानीकारक ठरू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

नागपूरमध्ये अधिवेशनावर बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितलं की, नागपूरच्या आमदार निवासात कोव्हिड सेंटर आहे. त्यामुळे नागपुरचेच काही आमदार नागपूरमध्ये यंदा हिवाळी अधिवेशन घेऊ नये, असं मत व्यक्त केलं आहे. मात्र, अधिवेशन कुठे घ्यायचं हे बिझनेस अॅडव्हाझरी कमिटी (BAC)निर्णय घेईल, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी दिवाळीत काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही भुजबळांनी यावेळी दिला आहे.

हेही वाचा..विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 23 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात शाळा सुरू होणार

दुसरीकडे, हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी नागपुरात बिझनेस अॅडव्हाझरी कमिटीची बैठक झाली. अधिवेशनाची तयारी आणि व्यवस्थेबाबत मुख्य सचिवांनी आढावा घेतला. कोरोनामुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईला घेण्याचा नागपूरच्या काही आमदारांनी आग्रह केला आहे. आता बिझनेस अॅडव्हाझरी कमिटीच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल.


Published by:
Sandip Parolekar


First published:
November 6, 2020, 12:29 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular