Home लेटेस्ट मराठी न्यूज राजकीय नेत्याशी 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचं लग्न? अभिनेत्रीने केला हा खुलासा marathi actor...

राजकीय नेत्याशी ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीचं लग्न? अभिनेत्रीने केला हा खुलासा marathi actor sonalee kulkarni podcast she talk about her wedding rumors with kolhapur politician mhjb | News

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं लग्न ही बाब देखील काही वर्षांपूर्वी चर्चेचा विषय बनली होती. याबाबत अनेक वर्षांनतर सोनालीने पॉडकास्टचा वापर करत भाष्य केले आहे.

मुंबई, 16 मे : आपल्याकडे लग्न या विषयावर फार आवडीने चर्चा केली जाते. मग ते कोणाचही लग्न असो. कलाकारांची लग्न हा तर त्यांच्या फॅन्सचा सर्वात आवडीचा विषय असतो. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं (Sonalee Kulkarni) लग्न ही बाब देखील काही वर्षांपूर्वी चर्चेचा विषय बनली होती. याबाबत अनेक वर्षांनतर सोनालीने पॉडकास्टचा वापर करत भाष्य केले आहे.

लॉकडाऊनमध्ये आपल्या फॅन्सबरोबर जोडले जाण्याचं एकमेव साधन म्हणजे सोशल मीडिया. या काळामध्ये विविध कलाकार त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, त्यांचे कुटुंबीय कसे आहेत, त्यांचा दिवस कसा जातो यांसारख्या अनेक गोष्टींबाबत त्यांच्या चाहत्यांशी बोलत असतात.

रिद्धीमा कपूरनं शेअर केला फॅमिली Photo, नीतू आणि रणबीर तर दिसले; पण बाबा…

हे कलाकार चाहतेवर्गाचे मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरताना दिसत आहेत. दरम्यान सोनाली पॉडकास्टच्या माध्यमातून तिच्या चाहत्याचं मनोरंजन करत आहे आणि तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पॉडकास्टमध्ये तिने तिच्या लग्नाच्या अफवेबाबत सांगितले आहे.

‘क्लासमेट्स’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सोनालीचं लग्न झालं अशा बातम्या खूप व्हायरल झाल्या होत्या. याबाबत सोनाली म्हणाली की सुरूवातीला चित्रपटाच्या सेटवर हा विषय गंमतीने घेतला गेला. कोल्हापूरच्या एका मोठ्या राजकीय व्यक्तीशी तिचं लग्न झाल्याच्या बातम्या वेगाने पसरत होत्या.

तिने आधी दुर्लक्ष केलं पण जेव्हा तिच्या चुलत बहिणीने तिला फोन करून तिला याबाबत विचारलं तेव्हा सोनालीच्या लक्षात आलं की ही साधी अफवा नाही आहे. त्यावेळी राजकीय ओळख असणारा तिचा मित्र अभिनेता सुशांत शेलारला या प्रकरणाबाबत माहिती काढण्यास सांगितले.

तेव्हा लक्षात आले की त्या राजकीय नेत्याची प्रतिमा खराब व्हावी याकरता त्याच्या विरोधकाने ही बातमी पसरवली होती. यावर सोनाली म्हणते की, ‘यात माझं नाव का गोवण्यात आले हे मात्र एक कोडं आहे’. अफवांमुळे एखाद्याला किती मनस्ताप होऊ शकतो याची प्रचिती या घटनेतून येत आहे.

या पॉडकास्टमध्ये लग्नाविषयीच्या कल्पना देखील यावेळी सोनालीने मांडल्या आहेत. सोनालीला चार पद्धतींनी लग्न करायचे आहे. आई पंजाबी असल्यामुे पंजाबी, महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार, ख्रिश्चन लग्नांविषयी आकर्षण असल्यामुळे ती एक पद्धत तर जोडीदाराला आवडेल अशी एखादी पद्धत, अशा एकूण 4 पद्धतींनी लग्न करण्याचे तिचं स्वप्न आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात सोनालीने तिच्या ‘पार्टनर’ बरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

दुबईत झिपलाईन अ‍ॅडव्हेंचरचा व्हि़डीओ पोस्ट करून तिने तिचा ‘पार्टनर’ कोण हे सांगितलं.  नवीन प्रवासाला माझ्या पार्टनरसोबत सुरुवात करतेय. चढ-उतार, साहसासाठी सज्ज आहे. असं कॅप्शन देत सोनालीने हा अ‍ॅडव्हेंचर व्हिडीओ शेअर केला होता. कुणाल बेनोडेकर या दुबईतील चार्टर्ड अकाऊंटंटसोबत ती सध्या रिलेशनशिपमध्ये असून लवकरच ती कुणालसोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे.

Tags:

First Published: May 16, 2020 11:39 AM IST

Source link

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular