Home लेटेस्ट मराठी न्यूज रडणे, छाती बडवणे बंद करा; शिवसेनेनं भाजपला फटकारले shivsena saamana-editorial on arnab...

रडणे, छाती बडवणे बंद करा; शिवसेनेनं भाजपला फटकारले shivsena saamana-editorial on arnab goswami arrest and bjp Protest mhss | Mumbai


भाजपवाल्यांनी अन्वय नाईक (anvay naik suicide case) यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत. पण भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागली आहे.

मुंबई, 05 नोव्हेंबर : ‘महाराष्ट्राच्या भाजपवाल्यांनी अन्वय नाईक (anvay naik suicide case) यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत. पण भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागली आहे. मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे त्यांचे धोरण स्पष्ट आहे’ असं म्हणत शिवसेनेनं (Shivsena) भाजपवर (BJP) जोरदार पलटवार केला आहे.

रिपब्लिक टीव्ही (Republic TV )वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी (arnab goswami arrest) यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गोस्वामी यांना अटक झाल्यामुळे भाजप नेत्यांनी राज्यभरात आंदोलनं पुकारले आहे. भाजपच्या या पवित्र्यावर शिवसेनेनं आपले मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका केली आहे.

‘सीतेवर आरोप होताच श्रीरामानेही सीतेवर अग्निपरीक्षेची वेळ आणली. ते तर रामराज्य होते. सीतेची अग्निपरीक्षा म्हणजे आजच्या बेगडी रामभक्तांना आणीबाणी किंवा श्रीरामाची हुकूमशाही वाटली काय? एका निरपराध माणसाची आत्महत्या त्यांच्या वृद्ध आईसह झाली. त्यांची पत्नी न्यायासाठी आक्रोश करीत आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केले. यात चौथा स्तंभ कोसळला असे सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखडू पाहत आहेत. एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा, तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील’ असा सणसणीत टोला सेनेनं भाजपला लगावला आहे.

‘अर्णब गोस्वामी यास एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली. त्याच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही. गोस्वामी यांनी टिळक-आगरकरांप्रमाणे सरकारविरोधात जहाल लिखाण केले. त्यामुळे सरकारने त्यांची गचांडी पकडली असे काही हे प्रकरण नाही. दोन वर्षांपूर्वी अलिबाग निवासी अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्येशी संबंधित ही अटक आहे. नाईक यांनी मृत्यूपूर्वी जे पत्र लिहिलं त्यात गोस्वामी यांच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहाराचा, फसवणुकीचा संदर्भ आहे. त्याच तणावातून नाईक व त्यांच्या आईने आत्महत्या केली. पण आधीच्या सरकारने गोस्वामी यांना वाचवण्यासाठी हे सर्व प्रकरण दडपले. त्यासाठी पोलीस व न्यायालयावर दबाव आणला’ असा आरोपही सेनेनं केला.

‘यात ‘आणीबाणी’ आली, काळा दिवस उजाडला, पत्रकारितेवर हल्ला झाला, असे काय आहे?  गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर प्रमुख नेत्यांच्याबाबत गरळ ओकली म्हणून त्यास अटक झालेली नाही. त्याचा संबंध एका मृत्यू प्रकरणाशी जोडला आहे व मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई आहे. त्यामुळे  गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला वगैरे अजिबात नाही. गुजरातमध्ये सरकारविरोधी लिहिणाऱ्या संपादकांना अटका झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात पत्रकारांचे मुडदे पाडले गेले तेव्हा कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही? असा थेट सवाल सेनेनं थेट अमित शहा यांनाच विचारला आहे.

‘कायद्यापुढे सगळे समान आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याची हिंमत दाखवली होती. त्या निर्णयातूनच आणीबाणीची बीजे रोवली गेली. कायद्याने पंतप्रधान इंदिराजी, नरसिंह राव यांनाही सोडले नाही. अनेक मंत्र्यांना गजाआड जावे लागले. कायद्याच्या कारवाईला सामोरे जाऊन अमित शहादेखील तावून सुलाखून बाहेर पडले आहेत’ असं म्हणत सेनेनं अमित शहा यांनाही टोला लगावला.


Published by:
sachin Salve


First published:
November 5, 2020, 9:02 AM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular