Home लेटेस्ट मराठी न्यूज मोठी बातमी! रेल्वेच्या या सरकारी कंपनीतील भागीदारी विकणार मोदी सरकार, अशी आहे...

मोठी बातमी! रेल्वेच्या या सरकारी कंपनीतील भागीदारी विकणार मोदी सरकार, अशी आहे योजना govt plans to sell up to 15 per cent stake in railway engineering company ircon international ltd know the plan mhjb | News


केंद्र सरकार रेल्वे इंजीनिअरींग कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (Ircon International Ltd.) मधील 15 टक्के भागीदारी विकण्याची योजना बनवत आहे.

नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर: केंद्र सरकार रेल्वे इंजीनिअरींग कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (Ircon International Ltd.) मधील 15 टक्के भागीदारी विकण्याची योजना बनवत आहे. हे स्टेक ऑफर फॉर सेल (OFS)च्या माध्यमातून विकण्यात येणार आहेत. सरकारकडे सध्या इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडची 89.18 टक्के भागीदारी आहे. ज्यापैकी 15 टक्के भागादारी विकण्याच्या विचारात सरकार आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. इरकॉन इंटरनॅशनल ही सरकारी इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी आहे.

एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की, बाजारातील परिस्थिती पाहून डिसेंबरपर्यंत इरकॉनसाठी ओएफएस आणण्याचा त्यांचा विचार सुरू आहे. याअंतर्गत कंपनीतील 10 ते 15 टक्के भागीदारी विकली जाईल. रेल्वे इंजिनीअरिंग कंपनी इरकॉन 2018 मध्ये शेअर बाजारात लिस्ट करण्यात आली होती. कंपनीने आयपीओच्या माध्यमातून 467 कोटी रुपये कमावले होते.

इरकॉन इंटरनॅशनल कसली कंपनी आहे?

इरकॉन इंटरनॅशनल ही एक शासकीय अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनी आहे. कंपनी पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल, बोगदा, एअरक्राफ्ट मेंटेनन्स, व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता, धावपट्टी, विद्युत, यांत्रिकी आणि औद्योगिक क्षेत्रात विकास करणारी इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. कंपनीची उपस्थिती परदेशातही आहे, याठिकाणी कंपनी बाजारात वृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

(हे वाचा-SBI Alert! ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना, आज मिळणार नाहीत बँकेच्या या सेवा)

बीएसई वर शुक्रवारी इरकॉनचा शेअर 77.95 रुपयांवर बंद झाला. सध्याच्या बाजार मूल्यानुसार इरकॉनमधील 15 टक्के हिस्सा विकून सरकार 540 कोटी रुपये जमा करू शकतात. चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 2.10 लाख कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्राच्या उपक्रमातील (CPSE) भागीदारी विकून 1.20 लाख कोटी रुपये आणि वित्तीय संस्थांमधील भागीदारी विकून 90,000 कोटी रुपये जमा करण्याचा सरकारचा विचार आहे. या आर्थिक वर्षात आतापर्यंत सीपीएसईमध्ये 6,138 कोटी रुपयांची भागीदारी विकली गेली आहे. दरम्यान कोरोनामुळे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) सारखी मोठ्या प्रमाणातील भागादारी विकण्यास विलंब झाला आहे.

(हे वाचा-PPF खाते बंद झाले तर अजिबात चिंता करू नका, अशाप्रकारे पुन्हा करा सुरू)

याशिवाय सरकार शेअर्सच्या विक्रीसाठी इंडियन रेलवे केटरिंग अँड टूरिझम कॉर्प. लिमिटेड (IRCTC) आणि रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) मधील भागीदारी विकण्याच्या तयारीत देखील आहे.


Published by:
Janhavi Bhatkar


First published:
November 8, 2020, 2:36 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular