Home लेटेस्ट मराठी न्यूज मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांचा उर्मिला मातोंडकर यांना फोन, सेनेकडून आमदारकी मिळण्याची शक्यता Urmila...

मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांचा उर्मिला मातोंडकर यांना फोन, सेनेकडून आमदारकी मिळण्याची शक्यता Urmila Matondkar likely to get MLA seat from Shiv Sena mhss | Mumbai


विधान परिषदेच्या आमदारकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बरीच चर्चा सुरू असून 12 जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे

मुंबई, 30 ऑक्टोबर : राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या (Governor-appointed MLA) यादीत कुणीची वर्णी लागणार अशी चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे, अभिनेत्री  उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar)यांना शिवसेनेच्या (Shivsena) कोट्यातून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे. याबद्दल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM uddhav Thackery) यांनीच उर्मिला मातोंडकर यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, विधान परिषदेच्या आमदारकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बरीच चर्चा सुरू असून 12 जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना सेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची सूत्रांनी माहिती आहे.

विशेष म्हणजे, काँग्रेसमध्ये अनेक जण आमदारकीसाठी इच्छुक आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीसाठी काँग्रेसची बुधवारी रात्री उशिरापर्यंत खलबतं सुरू होती. काँग्रेसकडून 3 जणांची नाव पाठवली जाणार आहे. यात  उर्मिला मातोंडकर, सत्यजित तांबे आणि नसीम खान खान यांच्या नावाची चर्चा आघाडीवर होती. पण,  उर्मिला मातोंडकर यांच्या जागी नगमा यांच्या नावाबद्दल चर्चा सुरू झाली. त्याचबरोबर माणिक जगताप, रजनी पाटील, मुझप्फर हुसैन यांच्या नावावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच चंद्रपूर येथील अनिरूद्ध वनकर  यांना काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल नियुक्त जागेत संधी मिळेल असं बोललं जात आहे. त्यामुळे पडद्यामागे आणखी घडामोडींना वेग आला आहे.

दरम्यान, भाजपला धक्का देत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसंच सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे देखील राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार होतील, अशी चिन्ह आहेत.

तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे सहकारी मानले जाणारे मिलिंद नार्वेकर हेदेखील विधीमंडळात दिसू शकतात. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत शिवसेनेकडून त्यांचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यासाठी माघार घेणाऱ्या माजी आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनाही शिवसेनेकडून संधी दिली जाऊ शकते, असं बोललं जात आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारकी कुणाला मिळू शकते?

कला, साहित्य, संस्कृती, समाजसेवा, क्रीडा अशा क्षेत्रातल्या मान्यवरांची आमदार म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्यपालांना आहेत. राज्यमंत्रिमंडळ या मान्यवरांची नावं निश्चित करतं आणि ती राज्यपालांकडे पाठवली जातात. राज्यपालांनी त्याला मान्यता द्यावी असे संकेत असले तरी त्यावर राज्यपाल आक्षेप घेऊ शकतात. त्यामुळे आता राज्यपाल कुठली भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Published by:
sachin Salve


First published:
October 30, 2020, 10:53 AM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular