Home लेटेस्ट मराठी न्यूज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे मोठे भाऊ, पण.., पंकजा मुंडेंनी केली मोठी मागणी...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे मोठे भाऊ, पण.., पंकजा मुंडेंनी केली मोठी मागणी cm Uddhav Thackeray is my elder brother but pankaja munde demand in bhagwangad dasara melava 2020 mhss | Maharashtra


‘मी विधानसभा निवडणुकीत हरले, पराभूत झाले. पण माझ्यापेक्षा कार्यकर्ते हे जास्त दुखावले गेले. साहेब आपल्यातून गेल्यापेक्षा हे मोठे दु:ख नाही’

बीड, 25 ऑक्टोबर : ‘आमचा दसरा मेळावा (bhagwangad dasara melava 2020) हा दरवर्षीप्रमाणे होऊ शकला नाही. आपल्या मेळाव्याचा जल्लोष हा मोठा असतो. पण, पुढच्या वर्षी याही पेक्षा मोठा मेळावा घ्यायचा आहे. एकदा आपल्याला शिवाजी पार्क सुद्धा भरवायचे आहे, अशी इच्छा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी बोलून दाखवली आहे.  तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पॅकेजची रक्कम वाढवावी, अशी मागणी पंकजांनी केली.

दरवर्षीप्रमाणे  भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगाव इथं पार पडला. पण, कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फेसबुकवर व्हिडीओ लाईव्ह करून मेळावा घेतला. यावेळी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे ऊसतोड आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मागणी केली.

‘भगवानगडावर येत असताना महिला आणि कार्यकर्त्यांनी माझे स्वागत केले.  भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या किर्तीमुळे माझे स्वागत होत आहे.आज मी एका ग्रामपंचायतीची सदस्यही नाही. पण तरीही महिलांनी  ठिकठिकाणी माझं स्वागत केलं. तुम्हाला माझी काळजी आणि मला तुमची काळजी हीच, आपली शक्ती आहे, असं म्हणत पंकजांनी भाषणाला सुरुवात केली.

‘पंकजा मुंडे घरातून बाहेर पडणार नाही, अशी चर्चा होती. भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली. पण, कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. भगवान गडावर दर्शन घेतल्या शिवाय माझा दसरा मेळावा पूर्णच होऊ शकत नाही. तुम्ही माझ्यासाठी मास्क काढून रिस्क घेतली, म्हणून मीही तुमच्यासाठी मास्क काढून उभे राहिले’ असं सांगत पंकजांनी मास्क न घालता भाषण केले.

‘नांदेडमध्ये अतिवृष्टी भागाची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. पण, 10 हजार कोटींमध्ये शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पॅकेजची रक्कम आणखी वाढवावी, अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली. यावेळी पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना दसरा मेळाव्याच्या शुभेच्छाही दिल्यात.

‘कोरोनाचे सगळे नियम तोडून मी उसतोड कामागारांच्या भेटीसाठी निघाले होते. तेव्हा मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. ते मला हक्काने रागवता. ते माझे मोठे भाऊ आहे. ऊसतोड कामगारांसाठी किती आदळआपट करणार, असं मुख्यमंत्र्यांनी विचारलं. तेव्हा सांगलीत उसतोड कामगार अडकले आहे, त्यांची सुटका करा असा विषय त्यांच्या कानी टाकला, त्यांनीही सकारात्मक निर्णय घेतला आणि लगेच सांगलीतून उसतोड कामगारांना घरी जाता आले, असा किस्साही पंकजांनी सांगितला.

‘मुंबई बसून निर्णय होत नाही. मग काय ढाब्यावर बसून निर्णय घ्यायचे का? ऊसतोड कामगारांसाठी नेता हा मुंबईतच काय, दिल्लीत बसला तर काय हरकत आहे?  ऊसतोड कामगारांचे महामंडळ तयार झाले नाही, ऊसतोड कामगारांच्या अपेक्षा पूर्ण झाले नाही. याची मला खंत आहे. जर दोन महिन्यांसाठीचा निर्णय पाच वर्षांसाठी भिजत ठेवला  तर ती जबाबदारी मी स्वीकारते, असं म्हणत पंकजांनी खेदही व्यक्त केला.

‘ऊसतोड कामगारांबद्दल शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी बोलणे झाले. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी बोलण्यासाठी लवाद नको, ही मागणी मी केली होती. आता तुमच्या कोर्टात चेंडू आहे. शरद पवार यांनीच पुढाकार घेऊन हा निर्णय मार्गी लावला पाहिजे’, अशी विनंतीही पंकजा मुंडेंनी केली.

‘मी विधानसभा निवडणुकीत हरले, पराभूत झाले. पण माझ्यापेक्षा कार्यकर्ते हे जास्त दुखावले गेले. साहेब आपल्यातून गेल्यापेक्षा हे मोठे दु:ख नाही. ‘जिंदगी के रेस में जो आपको दौड के हरा नहीं सकते. वो लोग आपको तोड कर हरा सकते है’ त्यामुळे माझ्या माणसांना कुणीही तोडलेले हे मी खपवून घेणार नाही, असंही पंकजा मुंडे यांनी ठणकावून सांगितले.

‘खूप लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही केले आहे. लोकांसाठी कसं काम करायचे, रस्त्यांवर कसं उतरायचं हे आम्हाला चांगले माहिती आहे. मुंडे साहेब हे दिल्लीत गेले होते. त्यामुळे पक्षाच्या स्तरावर मोठे काम करावे लागले. दिल्लीत गेली म्हणजे, बीड सोडले असा त्याचा अर्थ होत नाही. महाराष्ट्रातच मी लक्ष्य देणार आहे’, असंही पंकजांनी सांगितले.

‘आमचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे होऊ शकला नाही. आपल्या मेळाव्याचा जल्लोष हा मोठा असतो. पण, पुढच्या वर्षी याही पेक्षा मोठा मेळावा घ्यायचा आहे. एकदा आपल्याला शिवाजी पार्क सुद्धा भरवायचे आहे. शिवाजी पार्कमध्ये संघर्ष यात्रेचा समारोप करायचा आहे. त्यासाठी एक दिवस शिवाजी पार्कवर सभा घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही पंकजा मुंडेंनी व्यक्त केला.


Published by:
sachin Salve


First published:
October 25, 2020, 3:01 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular