Home लेटेस्ट मराठी न्यूज मुंबई महानगरपालिकेवर मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप MNS...

मुंबई महानगरपालिकेवर मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप MNS leader Ameya Khopkars serious allegations of corruption against the Mumbai Municipal Corporation mhas | News


मुंबई महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप मनसे नेते आणि जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला आहे.

मुंबई, 7 नोव्हेंबर : ‘पुन:श्च हरीओम’ म्हणून नाट्यप्रयोगांना परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन करायचं की नाट्यगृहांची दूरवस्था बघून दूषणं द्यायची? जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने जेव्हा नाट्यगृहांची पाहणी सुरु केली तेव्हा धक्काच बसला. मुंबई महानगरपालिकेने पाच वर्षांपूर्वी तब्बल सोळा कोटी रुपये खर्च करुन डागडुजी केलेल्या दीनानाथ नाट्यगृहाची अवस्था बिकट झाली असून हा 16 हजार कोटींचा भ्रष्टाचार आहे,’ असा गंभीर आरोप मनसे नेते आणि जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला आहे.

‘नाट्यधर्मी निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नाट्यगृहात जाऊन आढावा घेतला. विलेपार्ल्यातील दीनानाथ नाट्यगृहात प्रसाधनगृहांची अवस्था इतकी वाईट असेल तर तिथे प्रेक्षकांनी का यावं? कोरोनाकाळात स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व द्यायला हवं, पण इथे तर सगळा उफराटा कारभार आहे. केवळ पाचच वर्षांपूर्वी सोळा कोटी रुपये खर्च करुन डागडुजीच्या नावाखाली महापालिकेने नेमके कुणाचे खिसे गरम केले होते?’ असा सवालही अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे.

‘सोळा कोटी रुपयात खरंतर अद्ययावत नवीन नाट्यगृह बांधून झालं असतं, आणि इथे डागडुजीसाठी सोळा कोटी रुपये खर्च करुनही तकलादू काम करुन ठेवलेलं आहे. सध्या सुरु असलेल्या या कामासाठी शहा नावाचा सुपरवायझर बसवला आहे. सध्याचं काम कधी सुरु होणार आणि कधी संपणार हेसुद्धा त्याला माहिती नाही. असं असेल तर मग कलाकारांच्या पाठीशी उभं राहण्याचं ‘नाटक’ सरकार कशाला करतंय? अशा वास्तूत नाट्यप्रयोगांना परवानगी देऊन सरकार काय साध्य करु पाहतंय? नाट्यव्यवसायाला पुन्हा एकदा लवकरात लवकर उभारी मिळावी, हाच आमचा उद्देश आहे,’ असं म्हणत अमेय खोपकर यांनी महानगरपालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.


Published by:
Akshay Shitole


First published:
November 7, 2020, 11:01 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular