Home लेटेस्ट मराठी न्यूज मुंबईत एका दिवसातल्या कोरोनाबळींचा उच्चांक; रुग्णसंख्याही गेली 17,512 mumbai coronavirus update 34...

मुंबईत एका दिवसातल्या कोरोनाबळींचा उच्चांक; रुग्णसंख्याही गेली 17,512 mumbai coronavirus update 34 deaths in a day maharashtra coronavirus latest | News


मुंबईत आज एकाच दिवसात कोरोनामुळें 34 जणांचा मृत्यू नोंदला गेला. इतके मृत्यू एका दिवसात होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबई, 15  मे : मुंबईत आज एकाच दिवसात कोरोनामुळें 34 जणांचा मृत्यू नोंदला गेला. इतके मृत्यू एका दिवसात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईत आज 933 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 17512 वर पोहचली आहे.  आजवर मुंबईत एकूण 655 जणाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत विविध रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोरोनारुग्णांपैकी 24 जणांचा मृत्यू गेल्या 24 तासांत झाला आहे. पण मुंबई महापालिकेने आणखी 10 जणांचा मृत्यूही आज नोंदवला आहे. हे 10 रुग्ण 10 ते 12 मे दरम्यान मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे मुंबईत एकूण 34 रुग्णांचा Covid-19 ने मृत्यू नोंदवला गेला आहे. ही आतापर्यंतची एका दिवसातली सर्वात मोठी संख्या आहे. जवर मुंबईत एकूण 655 जणाचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईत 334 जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 4468 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

मुंबईपाठोपाठ ठाण्यातही कोरोनाची धोका वाढला आहे. ठाण्यात आज तब्बल 83 करोना बाधित रुग्ण सापडले. आतापर्यंत ठाण्यात एकूण 996 करोना रुग्णांचं निदान झालं आहे. त्यापैकी आतापर्यंत एकूण 48 जणांचा ठाण्यात करोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 273 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, आज राज्यात 1576 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 29100 झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पोहोचला कोरोना, 24 तासातले COVID19चे अपडेट

पाणबुड्या, लष्कराची गुप्त माहिती पाकला पुरवणाऱ्या हेराला मुंबईतून अटक

दफनभूमीत मृतानं केलं बाय बाय; Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम

First Published: May 15, 2020 08:43 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular