Home लेटेस्ट मराठी न्यूज 'मातोश्री'बाहेर पडले नाही, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जोरदार उत्तर | News

‘मातोश्री’बाहेर पडले नाही, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जोरदार उत्तर | News


लॉकडाऊनमध्ये कडी कुलुपं लावून सर्वजण घरी बसले आहे. माझ्यावर टीका झाली की, मातोश्रीच्या बाहेर पडलो नाही. पण,

मुंबई, 8 नोव्हेंबर: कोरोना (Corona) लॉकडाऊनमध्ये कडी कुलुपं लावून सर्वजण घरी बसले आहे. माझ्यावर टीका झाली की, मातोश्रीच्या बाहेर पडलो नाही. पण, मी घरी बसून सुद्धा कामं केली आहे. हजारो कोटींची करार केले आहेत. महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देण्याचं काम केलं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackery) यांनी विरोधकांच्या टीकेवर जोरदार उत्तर दिलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी 1.30 वाजता फेसबुक आणि युट्यूबवर व्हिडीओ लाईव्ह करून जनतेशी संवाद साधला.

हेही वाचा..महाराष्ट्रात फटाके फोडण्यावर बंदी नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

हवेमुळे कोरोनाचा विषाणू वाढत आहे. प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेवर बंदी आणता येईल. पण, फटाक्यावर बंदी (Firecrackers ban) घालण्यापेक्षा तुम्हीच जबाबदारी स्वीकारा. फटाके न फोडण्याचा जनतेनं संकल्प करावा. प्रदूषण टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याचे टाळावे, असं आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. राज्यात फटाके फोडण्यावर बंदी घालण्यास मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढा देत असताना महाराष्ट्र द्वेषी बदनाम करण्याचे जे कारस्थान केलं होतं. त्यामुळे कायदा सुव्यवस्था कोलमडून पडली आहे. अमली पदार्थांची शेती होत आहे. ते कारस्थान तोडून मोडून काढलं आहे. जूनमध्ये 17 हजार कोटींचे सामजस्य करार केले आहे. नुसते सामंजस्य करार केले नाही. तर काही जणांना जागा दिल्या आहे. गुंतवणूक सुरू झाली आहे. मागील आठवड्यात सुद्धा 35 हजार कोटींचे सामंजस्य करार झाले आहे. अनेक देशाविदेशातील कंपन्या या महाराष्ट्रात येत आहे. तरुणांना मोठ्याप्रमाणात रोजगार मिळणार आहे.

राज्यात आता उद्योग धंदे हे पूर्वपदावर येत आहे. सर्वत्र गर्दी ही वाढत चालली आहे. सर्व व्यवहार हे पूर्वपदावर येत आहे. पण, खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या काळात आपल्याकडून परिस्थिती ही अनियंत्रित होत असल्याची टीका झाली. पण, सर्वांनी धैर्याने सामना केला आणि आता त्याचा आलेख हा कमी झाला आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा…करून दाखवलं.. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’मुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश

‘गेल्या सात महिन्यांपासून लढा देऊन परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे चार दिवसांच्या धुरात हे वाहून जाता कामा नये, प्रदूषण टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याचे टाळा, शक्यतो फटाके फोडूच नये. फटाके फोडले नाही तर उत्तमच आहे. फटाकेवर बंदी आणली जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेऊन फटाके फोडू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.


Published by:
Sandip Parolekar


First published:
November 8, 2020, 2:44 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular