Home लेटेस्ट मराठी न्यूज India महबूबा यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर BJP आक्रमक, PDP कार्यालयावर फडकावला तिरंगा | National

महबूबा यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर BJP आक्रमक, PDP कार्यालयावर फडकावला तिरंगा | National


‘मुफ्तींनी पाकिस्तानात निघून जावं’ असा सल्लाही भाजप नेत्यानं दिला आहे.

श्रीनगर, 26 ऑक्टोबर: जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 (Article 370) पुन्हा लागू होईपर्यंत ना निवडणूक लढवणार, ना तिरंगा हातात घेणार’ असं म्हणत माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत. महबूबा मुफ्ती यांच्या राष्ट्रध्वजावरील वक्तव्यानंतर भाजप (BJP) कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

महबूबा यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी श्रीनगर ते कुपवाडा तिरंगा यात्रा काढली. एवढंच नाही तर श्रीनगर येथील प्रसिद्ध लाल चौकात तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी भाजपच्या चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा..बेडकाच्या पिलांशी तुलना केल्यानंतर निलेश राणेंनी दिलं थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

ABVP कार्यकर्त्यांची PDP कार्यालयाबाहेर घोषणाबाजी…

महबूबा मुफ्ती यांनी राष्ट्रध्वजबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी जम्मू येथील पीडीपी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. काही तरुणांनी जम्मू येथील पीडीपी कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकावला. यावेळी महबूबा मुफ्ती यांच्याविरोधात जोरदार घोषणावाजी करण्यात आली.

नेमकं काय म्हणाल्या होत्या महबूबा मुफ्ती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणूक 2020 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या एका सभेला संबोधताना काश्मीरमधील अनुच्छेद 370 हटवण्याचा मुद्दा उचलून धरला. बिहार निवडणुकीत या मुद्यावर त्यांनी मतंही मागितली. त्यानंतर थोड्याच वेळात काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 लागू करण्याविरोधात आघाडी करणाऱ्या नेत्या आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे. जोपर्यंत काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 परत लागू केला जाणार नाही तेव्हापर्यंत आपण ना निवडणूक लढवणार, ना तिरंगा हातात घेणार, अशी घोषणाच मेहबूबा मुफ्ती यांनी केली. ‘तिरंग्याशी आमचं नातं वेगळं नाही. जेव्हा आमच्या हातात हा झेंडा येईल, तेव्हा आम्ही तिरंगाही हातात घेऊ’ असं यावेळी महबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या झेंड्याकडे इशारा करत म्हटलं.

हेही वाचा..परवानगी नसताना काढली पालखी, सेनेच्या आमदारासह 50 जणांविरोधात गुन्हा दाखल

महबूबा मुफ्ती देशद्रोही…

भाजपनं महबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्याला देशद्रोही संबोधलं आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मोहसिन रजा यांनी महबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यावर टीका करतानाच ‘मुफ्तींनी पाकिस्तानात निघून जावं’ असा सल्लाही दिला आहे.


Published by:
Sandip Parolekar


First published:
October 26, 2020, 2:01 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular