Home लेटेस्ट मराठी न्यूज India मंदिरात नमाज पठणानंतर आता भाजपच्या नेत्याने वाचली मशिदीत हनुमान चालीसा | National

मंदिरात नमाज पठणानंतर आता भाजपच्या नेत्याने वाचली मशिदीत हनुमान चालीसा | National


मशिद हा अल्लाचा दरबार आहे. इथे प्रत्येकाला प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. कुठल्याही भाषेत इथे तुम्ही परमेश्वराची भक्ती करू शकता असं इथल्या मौलानांनी सांगितलं.

बागपत 04 नोव्हेंबर: मथुरेतल्या मंदिरात नमाज पठन केल्यानंतर आता उत्तर प्रदेशातल्या बागपत (Baghpat) मध्ये मशिदीत (Mosque) हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हटल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मात्र मशिदीचं व्यवस्थापन करणाऱ्या संचालकांनी त्या युवकाविरुद्ध कारवाई करण्यास मनाई केली आहे. युवक हा इथल्या गावचा असून ओळखीचा आहे त्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई करू नये असं इथल्या मौलांनांनी म्हटलं आहे.

मशिद हा अल्लाचा दरबार आहे. इथे प्रत्येकाला प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. कुठल्याही भाषेत इथे तुम्ही परमेश्वराची भक्ती करू शकता असं इथल्या मौलानांनी सांगितलं.

बागपत जवळच्या विनयपूर गांवामधल्या मशिदत ही घटना घडली आहे. मनुपाल बंसल या युवकाने हनुमान चालीसा म्हटल्याचं समोर आलं आहे. मनुपाल हे भाजपचे स्थानिक नेते आहेत अशी माहितीही समोर आली आहे.

याआधी मथुरेतल्या नंदबाबा मंदिरात नमाज (Namaz In Temple) पढन केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर बागपत मधल्या या युवकाने मशिदीमध्ये हनुमान चालीचा पठन केल्याची घटना घडली आहे. माहिती कळाल्यांनंतर पोलिसांनी तातडीने चौकशीला सुरूवात केली आहे.

मनुपाल हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहितचीही दिली जात आहे. सामाजिक सद्भावना वाढावी यासाठीच आपण मशिदीमध्ये हनुमान चालीसा म्हटल्याचं त्याने सांगितलं. तो मशिदीमध्ये गेला आणि फेसबुक लाईव्ह सुरू केलं. त्यानंतर त्याने फोनवरच हनुमान चालीसा लावली आणि तो म्हणू लागला. यासाठी त्याने मशिदीच्या मौलानांची परवानगी घेतल्याचंही बोललं जात आहे.

US Election 2020: श्रीनिवास कुलकर्णी नावाचा उमेदवारही लढवतोय अमेरिकन निवडणूक

मथुरेतल्या नंदगाव इथल्या नंदभवन मंदरात फैसल खान यांनी नमाज पठन केलं होतं. त्यांनी दिल्लीतून पोलिसांनी अटक केली. आपली भूमिका स्पष्ट करताना फैसल यांनी सांगितलं की आपण सामाजिक सद्भावना यात्रेवर होते. त्या दिवशी जेव्हा नंदभवन मंदिरात आलो असताना नमाज पठनाची वेळ झाली होती. त्यावेळी मंदिरातल्या लोकांनीच नमाजासाठी जागा दिली.

नंतर जेवायलाही घातलं. तेव्हा कुणीच आक्षेप नोंदवला नाही. त्यानंतर तीन दिवसांनी त्याला विरोध झाला असंही ते म्हणाले.


Published by:
Ajay Kautikwar


First published:
November 4, 2020, 3:11 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular