Home लेटेस्ट मराठी न्यूज बिहारमधील मोठी दुर्घटना, गंगा नदीत बोट बुडाली; 15 जण बेपत्ता bihar bhagalpur-boat-sinking-in-ganga-river-20-passengers...

बिहारमधील मोठी दुर्घटना, गंगा नदीत बोट बुडाली; 15 जण बेपत्ता bihar bhagalpur-boat-sinking-in-ganga-river-20-passengers still-missing mhss | National


या बोटीवर 50 पेक्षा जास्त लोकं स्वार होती. बोट बुडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन 30 लोकांना वाचवले आहे.

राहुल कुमार ठाकुर, प्रतिनिधी

भागलपूर, 05 नोव्हेंबर : बिहारमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच भागलपूर परिसरात गंगा नदीत(River Ganga) प्रवाशांनी भरलेली बोट (boat )उलटल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 15 जण बेपत्ता झाले आहे. तर आणखी काही जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर येथील गोपालपूर तीनटंगा जहाज घाटाजवळ ही दुर्घटना घडली आहे. या बोटीवर 50 पेक्षा जास्त लोकं स्वार होती. बोट बुडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन 30 लोकांना वाचवले आहे. यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. आतापर्यंत 15 ते 20 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे.

गोपालपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या तीनटंगा दियारा जहाज घाटावर काही मजूर आणि शेतकरी हे एका खासगी बोटीने शेतावर काम करण्यासाठी चालले होते. परंतु, बोटीत मर्यादेपेक्षा जास्त लोकं असल्यामुळे या बोट दुर्घटनाग्रस्त झाली, अशी माहिती समोर आली आहे.

बोट बूडत असताना काही जणांनी नदीत उडी मारून आपला जीव वाचवला तर काही जणांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवले आहे. अजूनही अनेक जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

या बोटीवर मर्यादेपेक्षा जास्त लोकं होती. आतापर्यंत या घटनास्थळावरून 30 पेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात यश आले आहे. आतापर्यंत एका महिलेचा मृतदेह हा सापडला आहे. अजूनही शोधकार्य सुरू आहे. जखमी लोकांना गोपालपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहे. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.


Published by:
sachin Salve


First published:
November 5, 2020, 12:40 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular