Home लेटेस्ट मराठी न्यूज बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यास Pak-US संबंध सुधारणार? भारताला राहावं लागेल अलर्ट |...

बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यास Pak-US संबंध सुधारणार? भारताला राहावं लागेल अलर्ट | News


बायडन यांना 2008 मध्ये पाकिस्तातील दुसरा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘हिलाल-ए-पाकिस्‍तान’ देण्यात आला आहे.

इस्लामाबाद/वाशिंग्टन, 5 नोव्हेंबर : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत (US Election result) डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) आता बहुमतापासून काही अंतरावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनात अडचणीत असलेल्या पाकिस्तानासाठी (Pakistan) बायडन यांचं यश खूप महत्त्वपूर्ण आहे. बायडन हे जुने पाकिस्तान समर्थक असल्याचे मानले जाते. बायडन यांना 2008 मध्ये पाकिस्तातील दुसरा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘हिलाल-ए-पाकिस्‍तान’ देण्यात आला आहे. बायडन हे त्या ठराविक अमेरिकन नेत्यांपैकी आहेत जे पाकिस्तानला आर्थिक मदत करण्याचं समर्थन करते.

बायडन यांना ‘हिलाल-ए-पाकिस्‍तान’ मिळण्यामागे एक बाब आहे. सांगितले जाते की, 2008 मध्ये बायडन यांच्या प्रयत्नांमुळे पाकिस्तानला प्रत्येक वर्षी दीड बिलियन डॉलर इतरी गैर-सैन्य मदत देण्यात आली होती. सिनेटमध्ये हा प्रस्ताव बायडन आणि सिनेटर रिचर्ड लुगर घेऊन आले होते. तत्कालिन पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली जरदारी यांनी पाकिस्तानला साथ देण्यासाठी बायडन यांचे धन्यवाद मानले. बायडन यांच्यानुसार पाकिस्तान दहशतवाद्याने पीडित आहे आणि त्यांची आर्थिक मदत थांबवणं योग्य नाही.

हे ही वाचा-US Election2020 : बायडन यांची संपत्ती किती? एका भाषणासाठी घेतात 74 लाख

भारताबाबत वादग्रस्त विधान

बायडन यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान काश्मिरच्या मुद्द्यावर भारत विरोधी वक्तव्य समोर आले आहेत. मुस्लिम अमेरिकनमध्ये निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये त्यांच्या टीमने सांगितलं की, काश्मिरच्या मुस्लिमांची तुलना बांग्लादेशातील रोहिंग्या आणि चीनमध्ये उइगर मुस्लिमांसोबत केली होती. प्रचारात भारत सरकारला आर्टिकल 370 बहाल करण्यात सांगितले होते. बायडन यांच्या उपराष्ट्राध्यक्षाच्या उमेदवार कमला हॅरिसदेखील काश्मिरमध्ये दखल देण्याबाबत वक्तव्य केलं. पाकिस्तानदेखील सातत्याने अमेरिकेला काश्मीर प्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती करीत आहेत. पाकिस्तानातील तज्ज्ञांनुसार व्हाइट हाऊसमध्ये बायडन यांच्या उपस्थितीमुळे कर्जात आकंठ बुडालेल्या पाकिस्तानला दिलासा मिळू शकतो. बायडन आपल्या परराष्ट्र नीतीमध्ये पाकिस्तानसह चांगले संबंध प्रस्थापित करू शकते. पाकिस्तानी सेनाच्या रिटायर्ड लेफ्टनंट जनरल आणि राजकीय सैन्य प्रकरणातील एक वरिष्ठ विश्लेषक तलत मसूद यांच्यानुसार बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध पुन्हा सुरळीत होतील.


Published by:
Meenal Gangurde


First published:
November 5, 2020, 7:13 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular