Home लेटेस्ट मराठी न्यूज बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचं निधन The religious guru of...

बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचं निधन The religious guru of the Banjara community Dr Ramrao Maharaj passed away at mumbai mhss | Mumbaiडॉ रामराव महाराज यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर मागील दीड महिन्यापासून उपचार सुरू होते.

मुंबई, 31 ऑक्टोबर : वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील बंजारा बांधवांचे धर्मगुरू संत डॉ रामराव महाराज ( Dr. Ramrao Maharaj ) यांचे वयाच्या 89 व्या निधन झाले.  कोजागिरी पौर्णिमेला रात्री 11 च्या दरम्यान मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये (lilavati hospital) दीर्घ आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ रामराव महाराज यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर मागील दीड महिन्यापासून उपचार सुरू होते. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.  डॉ रामराव महाराज यांचे पार्थिव आज रात्रीपर्यंत पोहरादेवी इथं पोहोचणार आहे. त्यानंतर रविवारी दिवसभर भक्तांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर अंत्यविधी सोमवारी करण्यात येणार असल्याची माहिती महंत बाबूसिंग महाराज, संजय महाराज यांनी दिली आहे.

रामराव  महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935 ला पोहरादेवी येथे झाला होता. रामराव महाराज यांना पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज यांच्या गादीवर परिसरातील 52 गावाच्या नाईक यांनी संत परशराम महाराज शिवलिन झाल्यावर वयाच्या 14 व्या वर्षी 1948 मध्ये बसविले होते.

12 वर्ष अनुष्ठान आणि 12 वर्ष मौन धारण केल्यावर रामराव महाराज यांनी देश भ्रमण सुरू केले होते.  काही महिन्यांपासून बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांची प्रकृती ठीक राहत नसल्यानं त्यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना  कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी  त्यांनी या जगाचा निरोप घेतला. रामराव महाराज यांच्याविषयी बंजारा समाजाची अपार श्रद्धा असून त्यांच्या निधनामुळे भक्तांवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉ.रामराव महाराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ‘बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज पोहरादेवीकर, यांच्या दुःखद निधनाने एका महान तपस्वीला आम्ही समस्त भक्तगण मुकलो आहोत. त्यांचे विचार, तळागाळातील लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणा देत राहतील’ अशी भावना व्यक्त करत पंकजा मुंडे यांनी रामराव महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


Published by:
sachin Salve


First published:
October 31, 2020, 11:17 AM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular