Home लेटेस्ट मराठी न्यूज प्रियांकाने केसांचं हे नेमकं काय केलंय? बाथरोबमध्ये डान्स करतानाचा VIDEO पाहून चाहत्यांचा...

प्रियांकाने केसांचं हे नेमकं काय केलंय? बाथरोबमध्ये डान्स करतानाचा VIDEO पाहून चाहत्यांचा सवाल priyanka chopra shares video of her with quirky hairstyle video went viral mhjb | News


प्रियांका चोप्राने बाथरोब घालून पंजाबी गाण्यावर थिरकतानाचा एक व्हडीओ शेअर केला आहे. पण यावेळी तिच्या चाहत्यांचं लक्ष तिच्या कपड्यांकडे किंवा मेकअपकडे नाही तर तिच्या केसांवर आहे.

मुंबई, 16 मे : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडीओ पोस्ट करत असते. तिने केलेल्या फॅशन्स सर्रास फॉलो केल्या जातात किंवा त्याचा ट्रेंड बनून जातो. मात्र अनेकदा तिच्या कपड्यांमुळे किंवा मेकअपमुळे प्रियांकाला ट्रोल देखील व्हावं लागलं आहे. मात्र नुकताच प्रियांकाने पोस्ट केलेला व्हिडीओ तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारा आहे. बाथरोब घालून प्रियांका एका पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. पण यावेळी तिच्या चाहत्यांचं लक्ष तिच्या कपड्यांकडे किंवा मेकअपकडे नाही तर तिच्या केसांवर आहे.

कारणही तसच आहे, प्रियांका आजवर कधीही अशा वेगळ्या किंवा विचित्र हेअरस्टाइलमध्ये दिसली नाही आहे. यामध्ये तिने केसांचा उंचवटा करून तिने काहीतरी वेगळी हेअरस्टाइल केली आहे. या व्हिडीओला तिने ‘dancing into weekend…’ अशी कॅप्शन देखील दिली आहे. मात्र तिने शेअर केलेल्या या व्हिडीओवर आलेल्या कमेंट्स त्याहून भन्नाट आहेत.

प्रियांकाच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने म्हटलं आहे की, ‘आमच्या देशातील कोहिनूर हिऱ्याचे विदेश लोकांनी काय हाल केले आहेत’, तर आणि एक युजर म्हणतो आहे की ‘ही कोणती हेअरस्टाइल आहे, पर्वत’. या व्हिडीओवर अशा असंख्य हास्यास्पद कमेंट्स आल्या आहेत. तर काहींनी प्रियांकाचं कौतुक देखील केले आहे.

(हे वाचा-कृष्णाच्या रुपात बाबाला पाहून स्वप्निलची मुलं अचंबित, त्यांचा विश्वासच बसला नाही)

प्रियांका सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांबरोबर संवाद साधत असते. दरम्यान कोरोनाबाबत जनजागृती पसरवण्याचे काम देखील प्रियांका करत आहे.

First Published: May 16, 2020 07:30 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular