Home लेटेस्ट मराठी न्यूज प्रवास होणार आणखी सुस्साट;अमेरिकेत झाली हायपरलूपची पहिली मानवी चाचणी richard-branson-s-virgin-hyperloop-trasport-testing-on-sunday-gh | Auto-and-tech

प्रवास होणार आणखी सुस्साट;अमेरिकेत झाली हायपरलूपची पहिली मानवी चाचणी richard-branson-s-virgin-hyperloop-trasport-testing-on-sunday-gh | Auto-and-tech


रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन हायपरलूपची (Virgin Hyperloop) पहिली मानवी चाचणी करण्यात आली आहे. येत्या काही वर्षात आपल्या देशातही दळणवळणाचा हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.

मुंबई, 09 नोव्हेंबर: अरबपती रिचर्ड ब्रॅन्सन (Richard Branson) यांच्या व्हर्जिन हायपरलूपची (Virgin Hyperloop) पहिली मानवी चाचणी करण्यात आली आहे. मागील रविवारी ही चाचणी करण्यात आली असून यामध्ये 2 व्यक्तींनी 160 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने प्रवास केला. याचबरोबर व्हर्जिन हायपरलूप ही कंपनी या टेक्नॉलॉजीची टेस्टिंग करणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे. या टेस्टिंगमध्ये कंपनीचे सीटीओ जोश गिगल आणि पॅसेंजर एक्सपीरिअन्स निर्देशक सारा लुचियान यांनी प्रवास केला.

400 मानवरहित टेस्टिंगनंतर मानव चाचणी

अमेरिकेतील नेवाडा इथे या हायपरलूपची चाचणी करण्यात आली आहे. या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या टेस्टिंग ट्रॅकवर याची चाचणी करण्यात आली. 5 मीटर लांब आणि 3.3 मीटर रुंद ट्रॅक आहे. ही मानवी चाचणी कारण्याआधी कंपनीने 400 मानवरहित चाचण्या केल्याचा दावा केला आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच मानवी चाचणी करण्यात आली आहे.

यासाठी या व्यक्तींना एका पॉडमध्ये बसवण्यात आले होते. त्यानंतर ट्रॅकवर  पॉडची चाचणी करण्यात आली असता याचा स्पीड 160 किलोमीटर प्रतितास मोजण्यात आला. हा पॉड 28 सीटर एक्सपी-2 पेगससचे छोटे व्हर्जन आहे. भविष्यात कंपनी याच पॉडला लाँच करण्याची योजना बनवत आहे.

हायपरलूप म्हणजे काय रे भाऊ?

हायपरलूप हा दळणवळाची नवीन पद्धत आहे. सर्वात वेगवान ही प्रवास व्यवस्था असणार आहे. पर्यावरणावर याचा कोणताही परिणाम होणार नसून 2014 मध्ये कंपनीने हे व्हर्जिन हायपरलुप सुरु केले होते.

इलॉन मस्क यांच्या अल्फा पेपरमध्ये याला पाचवे ट्रांसपोर्टेशन मोड असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये व्यक्ती आणि मालवाहतूक दोन्हीही करता येणार आहे. 2040 पर्यंत जगभरात कार, ट्रक आणि विमानांची संख्यादेखील दुप्पट होणार आहे.  त्यामुळे वाहतुकीची ही नवीन पद्धत खूप मोठ्या प्रमाणात उपयोगी येणार आहे.

महाराष्ट्रातदेखील मुंबई आणि पुण्यादरम्यान हायपरलुप प्रकल्प राबवण्याची योजना सुरू करण्याचा विचार व्यक्त करण्यात आला होता. पण तो नंतर मागे पडला. मेट्रो, बुलेट ट्रेनच्या मार्गावर भारत  जात आहे त्यामुळे भविष्यात आपल्या देशातही हायपरलूपने प्रवास करण्याची संधी मिळू शकते.


Published by:
Amruta Abhyankar


First published:
November 9, 2020, 7:44 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular