Home शहरं pune पुण्यातील मनसेचा आक्रमक आवाज दाबण्याचा प्रयत्न! रुपाली पाटील यांना धमकी | Crime

पुण्यातील मनसेचा आक्रमक आवाज दाबण्याचा प्रयत्न! रुपाली पाटील यांना धमकी | Crime


अशा पोकळ धमकीला मी घाबरणारी नाही. विद्यार्थी, शिक्षकांच्या अधिकार आणि हक्कांसाठी लढत राहीन

पुणे, 21 नोव्हेंबर: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे MNS) उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांना जीवे मारण्याची धमकी (Threatened to kill)मिळाली आहे. साताऱ्यातून अज्ञात व्यक्तीनं आपल्याला फोनवरून जीव मारण्याची धमकी दिल्याचं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर रुपाली पाटील यांनी पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी यांनी केली आहे.

हेही वाचा..भाजप नगरसेविकेचा रुद्रावतार, आरटीआय कार्यकर्त्याच्या घरात घुसून केली तोडफोड

पुण्यातील मनसेचा आक्रमक आवाज अशी रुपाली पाटील यांची ओळख आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर अशा भागांना भेटी देऊन पदवीधरांशी संवाद साधला. यावेळी फोन करुन एका व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप रुपाली पाटील यांना आहे. पोलिसांनी तक्रारीची तातडीनं दखल घेऊन धमकी देणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने रविवारपासून रुपाली पाटील या सातारा दौऱ्यावर आहेत. अशावेळी धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षा पुरविण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

धमकीनंतर काय म्हणाल्या रुपाली पाटील?

‘अशा पोकळ धमकीला मी घाबरणारी नाही. विद्यार्थी, शिक्षकांच्या अधिकार आणि हक्कांसाठी लढत राहीन, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी धमकीनंतर व्यक्त केली आहे.

दरम्यान, पुणे शहरातील मनसेचा आक्रमक आवाज म्हणून रुपाली पाटील यांची ओळख आहे. पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून रुपाली पाटील यांनी काम पाहिले आहे. सध्या त्या मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा..Drugs प्रकरणी कॉमेडियन भारती सिंहला NCBनं केली अटक, पतीचीही कसून चौकशी

मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांचं विशेष काम आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे.


Published by:
Sandip Parolekar


First published:
November 21, 2020, 8:54 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular