Home लेटेस्ट मराठी न्यूज पुणे: ‘आमच्या जीवाशी खेळू नका’, संतप्त ग्रामस्थांनी लावली कचरा प्रकल्पाला आग VIDEO...

पुणे: ‘आमच्या जीवाशी खेळू नका’, संतप्त ग्रामस्थांनी लावली कचरा प्रकल्पाला आग VIDEO | Pune


या ठिकाणी कचऱ्याचे 30 ते 35 फूट कचऱ्याचे ढीग असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी जेसीबी, पोकलेन यांची मदत घेण्यात येत आहे.

पुणे 01 नोव्हेंबर: आंबेगाव बुद्रुक येथे पालिकेने नव्याने कचरा प्रक्रिया प्रकल्प (Pune waste management issue)उभारण्यात आला असून यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी रविवारी आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द व जांभूळवाडी येथील नागरिकांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. याचवेळी काही नागरिकांनी कचरा प्रकल्पालाचा आग लावल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी कात्रज, सनसिटी आणि कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

यावेळी अग्निशमन दलाच्या 8 फायरगाङ्या व टँकर घटनास्थळी असून आग विझवण्याचं काम सुरू केलं. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस दाखल झाले असून आग कोणी लावली याचा शोध पोलीस घेत आहेत. शहरातला कचरा आणून आमच्या जीवाशी खेळ करू नका असा इशाराही ग्रावस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

या ठिकाणी कचऱ्याचे 30 ते 35 फूट कचऱ्याचे ढीग असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी जेसीबी, पोकलेन यांची मदत घेण्यात येत आहे. कचरा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी कचरा प्रकल्पाला आग लावण्यासोबत येथील कार्यालयाची तोडफोड देखील करण्यात आली आहे.

आंबेगाव बुद्रुक सर्व्हे नं. 50 मधील 40 गुंठे आरक्षित जागेवर 100 टन क्षमतेचा हा कचरा प्रक्रिया प्रकल्प बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचा आरोप होतोय. यामुळे आंबेगावचे वातावरण दूषित होऊन जांभूळवाडी तलाव,  नैसर्गिक स्वच्छ पाण्याचे स्त्रोत, बोरिंग आणि विहिरीचे पाणी दूषित होऊन निसर्गाचा ऱ्हास होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.

अनेक लहान लहान बैठी घरे व उंच सोसायट्यामधील नागरिकांना गेल्या कित्येक दिवसापासून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या कचरा प्रकल्पमध्ये येवलेवाडी, कोंढवा, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, धनकवडी आदी परिसरातून कचरा आणला जात असल्याने आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द व जांभूळवाडी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचंही गावकऱ्यांनी सांगितलं.

या कचरा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी रविवारी सकाळी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी कायद्याचा आधार घेऊन हा कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करण्याच्या दृष्टिकोनातून कचरा प्रक्रिया प्रकल्प विरोधी कृती समिती स्थापन करण्याच्या निर्धार आंबेगावचे माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील यांनी केला.


Published by:
Ajay Kautikwar


First published:
November 1, 2020, 6:08 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular