Home लेटेस्ट मराठी न्यूज India पाकिस्तानातून 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, BSFने केला धक्कादायक खुलासा | National

पाकिस्तानातून 300 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत, BSFने केला धक्कादायक खुलासा | National


Kashmir गेल्या वर्षभरात 200 पेक्षा जास्त दहशतवादी सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाले आहेत. गेल्या वर्षभरात पाकिस्तानने 3800 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.

श्रीनगर 9 नोव्हेंबर: सीमा सुरक्षा दलाने (BSF) पाकिस्तानचा दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा मोठा डाव उधळून लावला आहे. जम्मू-कश्मीर (Jammu-Kasmir)मधल्या नियंत्रण रेषेजवळच्या माछिल सेक्टरमध्ये शोध मोहिम राबविण्यात येत असून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात येत आहेत. या भागात दहशतवादी (Terrorist) लपून राहणार नाहीत याची खात्री करण्यात येत असल्याचं सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक BSF ADG) सुरिंदर पवार (Surinder Pawar) यांनी सांगितलं आहे.

तर गेल्या वर्षभरात 200 पेक्षा जास्त दहशतवादी सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाले आहेत.

हिवाळ्यापूर्वी भारतात 300 दहशतवादी घुसण्याच्या (Terrorists Infiltration) तयारीत असल्याचही पवार यांनी सांगितलं पाकिस्तानात सीमेवर असलेल्या तळांवर हे दहशतवादी आहेत. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे काश्मीरमध्ये दऱ्या खोऱ्यांमधले सगळे मार्ग बंद होतात. त्या आधी पाकिस्तान या दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सीमांवर लष्कर सतर्क असून हे सगळे प्रयत्न हाणून पाडले जातील असंही लष्कराने म्हटलं आहे.

बर्फवृष्टीमुळे पुढचे काही महिने काश्मीरातले सगळे व्यवहार थंडावतात. त्याचबरोबर चोरवाटाही बंद होतात. त्यामुळे दहशतवाद्यांना भारतात घुसणे कठिण काम असतं. त्यामुळे दरवर्षी पाकिस्तान हे काम करत असतो.

पाकिस्तानलाही चीनवर विश्वास नाही; मित्र असूनही चिनी लस घेण्याची का वाटते भीती?

अनेक वेळा भारताकडून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानला अजुनही जाग आलेली नाही. गेल्या वर्षभरात पाकिस्तानने 3800 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची धक्कादायक माहिती परराष्ट्रमंत्रालयाने दिली आहे. त्याच बरोबर पाकिस्तान आता ड्रोन्सचा वापर करत भारतात दहशतवाद्यांना शस्त्रे आणि ड्रग्ज पुरवढा करत असल्याचा धक्कादायक खुलासाही परराष्ट्रमंत्रालयाने केला आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये यासंबंधात काही घटना उघडकीस आल्या होत्या. परराष्ट्र मंत्रालयाने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावरून पाकिस्तानवर ठपका ठेवला आहे. पाकिस्तान अजुनही दहशतवाद्यांना मदत करत असल्याच्या आरोपांचाही भारताने पुनरुच्चार केला आहे.

चीनसह या मोठ्या देशांनी दिल्या नाहीत बायडेन यांना विजयाच्या शुभेच्छा

पंजाब आणि काश्मीरमधल्या सीमावर्ती भागात ड्रोन्सचा वापर करून पाकिस्तान दहशतवाद्यांना शस्त्रांचा पुरवढा करतो आहे. अशा प्रकारची अनेक ड्रोन्स सुरक्षा दलांना ताब्यात घेतली आहेत. AK-47सारख्या अत्याधुनिक रायफल्सचा त्यात समावेश होता.एवढच नाही तर ड्रग्जचाही त्यात समावेश असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळ भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.


Published by:
Ajay Kautikwar


First published:
November 9, 2020, 10:13 PM IST







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular