Home लेटेस्ट मराठी न्यूज पहिल्याच दिवशी राज्यातल्या 8,268  ग्राहकांना घरपोच देण्यात आली दारु, Liquor was delivered...

पहिल्याच दिवशी राज्यातल्या 8,268  ग्राहकांना घरपोच देण्यात आली दारु, Liquor was delivered to 8268 customers in the Maharashtra on the first day mhak | News


गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून शनिवारपासून सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच दारु पोहोचविण्यात आली.

मुंबई 16 मे: गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून शनिवारपासून सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच दारु पोहोचविण्यात आली. आज दिवसभरात राज्यातील 8,268 ग्राहकांना घरपोच दारू देण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षक कार्यालयात व अधीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्य सेवन परवाने ऑफलाईन पद्धतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. हे परवाने एका वर्षाकरिता १०० रुपये किंवा आजीवन परवान्याकरिता १००० रुपये एवढे शुल्क अदा करून मिळवू शकतात.

राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार ही परवानगी दिली आहे. घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी  करण्यात येत आहे.

राज्यात 24 मार्च, 2020 पासुन लॉकडाऊन सुरु आहे. शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी  गेल्या 48 तासांमध्ये राज्यात 119 गुन्हे नोंदविण्यात आले असून 63 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या ‘आशिर्वादा’ने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर खूनी खेळ, एकाची हत्या

24 लाख 16 हजार  रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 24 मार्च, 2020 पासुन 15 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 5,608  गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,520 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 565 वाहने जप्त करण्यात आली असून 15 कोटी 17 हजार किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

लॉकडाऊनमध्ये डिप्रेशनमुळे अभिनेत्याची आत्महत्या, मृत्यूनंतर लोकांनी मदत नाकारली

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस 24 तास सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असंही विभागाने म्हटलं आहे.  यासाठी टोल फ्री क्रमांक – 18008333333  व्हाट्सअँप क्रमांक – 8422001133 हा आहे.

 

First Published: May 16, 2020 09:52 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular