Home लेटेस्ट मराठी न्यूज पगार नाही मन मोठं असावं लागतं; सफाई कर्मचाऱ्याला 20000 पगार, मात्र लाखोंचं...

पगार नाही मन मोठं असावं लागतं; सफाई कर्मचाऱ्याला 20000 पगार, मात्र लाखोंचं केलं दान street-cleaner-donate-more than 8-lakhs-for-poor-children-in-china this is the reason china man story goes viral mhkb | Viral


सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीला दर महिन्याला जवळपास 20 हजार रुपये मिळतात. या पगारात ते आपल्या कुटुंबासह काही गरीब मुलांसाठीही पैशांची मदत करतात.

बिजिंग, 8 नोव्हेंबर : अनेक कर्मचारी आपल्या मेहनतीने कुटुंबासाठी काही पैसे कमवतात, जमवतात. पण कुटुंबासाठी पैसे कमवत असतानाच, सामाजिक जाणीवेतून दुसऱ्यांसाठी पैशांची बचत करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांची मोठी चर्चा आहे. या चर्चेमागचं कारण ऐकून तुम्हालाही कौतुक वाटेल. सध्या चीनमधल्या (China) एका सफाई कर्मचाऱ्याची मोठी चर्चा आहे. हा सफाई कर्मचारी आपल्या तुटपुंज्या पगारातूनच बचत करून, ते पैसे गरीब मुलांमध्ये दान करतो. आतापर्यंत त्याने तब्बल 8 लाखांहून अधिक रुपये गरीब मुलांसाठी दान केले आहेत.

चीनमधील झाओ नावाचे व्यक्ती सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. त्यासाठी त्यांना दर महिन्याला जवळपास 20 हजार रुपये मिळतात. या पगारात ते आपल्या कुटुंबासह काही गरीब मुलांसाठीही पैशांची मदत करतात. झाओ यांनी 30 वर्षांमध्ये गरीब मुलांसाठी जवळपास 8.80 लाख रुपयांची मदत केली आहे.

(वाचा – हे काय…रस्ता तर बांधला, पण पूल बांधायलाच विसरलं सरकार)

झाओ आपल्या कुटुंबासोबत अतिशय साधेपणाने जीवन जगतात. दर महिन्याला मिळणाऱ्या वेतनातून आपल्या कुटुंबाचा खर्च करुन ते इतर गरीब मुलांसाठीही बचत करतात. मिळालेल्या माहितीनुसार, झाओ यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आई मानसिकदृष्ट्या आजारी पडल्या.

त्यावेळी अशा परिस्थितीत झाओ यांना इतरांनी दिलेल्या दानाची मदत झाली. झाओ आपल्या कुटुंबाचा खर्च मिळालेल्या दानावर चालवत होते. त्यांच्या आईचा इलाजगी दान म्हणून मिळालेल्या पैशातूनच होत होता.

(वाचा – खोल दरीत लटकण्याचा आनंद घेण्यासाठी या हॉटेलला जातात लोकं, थरकाप उडवणारे PHOTO)

झाओ यांनी सांगितलं की, त्यांनी लहानपणी दान मिळालेल्या पैशातून आपला कुटुंब सांभाळलं होतं. त्यामुळे आता तेदेखील इतर गरीब मुलांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. झाओ यांचा हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असून, त्यांच्या या भावनेची सर्वत्र प्रशंसा होत आहे.


Published by:
Karishma Bhurke


First published:
November 8, 2020, 5:07 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular