Home लेटेस्ट मराठी न्यूज नोव्हेंबरमध्ये दिवाळीव्यतिरिक्त या दिवशीही असणार बँका बंद, सुट्टीची यादी तपासून त्यानुसार करा...

नोव्हेंबरमध्ये दिवाळीव्यतिरिक्त या दिवशीही असणार बँका बंद, सुट्टीची यादी तपासून त्यानुसार करा कामांचं नियोजन in november 2020 for how many days will the banks be closed check holiday list in nov 2020 mhjb | Money


महिन्याच्या दर रविवारी आणि दुसऱ्या शनिवारी बँका बंद (Bank Holidays November 2020) असतात. पण नोव्हेंबर महिना सणासुदीच्या (Diwali 2020) काळात येत असल्याने याव्यतिरिक्तही काही सुट्ट्या असतात. त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा कोणत्या दिवशी सुट्ट्या आहेत.

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर: फेस्टिव्ह सीझन दरम्यान नोव्हेंबरमध्ये दिवाळी, छठ पूजा यांसारखे अनेक सण भारतीय साजरे करत असतात. यादिवसांमध्ये बँका बंद असतात. काही सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये सारख्या असतात, तर काही राज्यानुरूप बदलतात. परिणामी रविवार आणि शनिवार व्यतिरिक्तही काही दिवस बँक हॉलिडे असतो. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला जर बँकिंगशी संबंधित महत्त्वाचे काम करायचे असेल तर तुम्ही या सुट्ट्यांप्रमाणेच तुमच्या कामाचे नियोजन करू शकता. त्याचप्रमाणे काही कामं तुम्ही ऑनलाइन पूर्ण करू शकता, ज्याकरता तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही.

नोव्हेंबर महिन्यात या तारखांना बंद राहणार बँका-

1 नोव्हेंबर रोजी रविवार असल्यामुळे सर्व राज्यातील बँकांना सुट्टी

8 नोव्हेंबर रोजी रविवार असल्यामुळे सर्व राज्यातील बँकांना सुट्टी

14 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनानिमित्त बँकांना सुट्टी

15 नोव्हेंबर रोजी रविवार असल्यामुळे सर्व राज्यातील बँकांना सुट्टी

16 नोव्हेंबर रोजी भाऊबीज असल्यामुळे सर्व राज्यातील बँकांना सुट्टी

20 आणि 21 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये छठ पुजेनिमित्त सुट्टी असेल. 20 तारखेला रांचीमध्ये देखील सुट्टी आहे.

22 नोव्हेंबर रोजी रविवार असल्यामुळे सर्व राज्यातील बँकांना सुट्टी

28 नोव्हेंबर रोजी चौथा शनिवार असल्यामुळे सर्व राज्यातील बँकांना सुट्टी

29 नोव्हेंबर रोजी रविवार असल्यामुळे सर्व राज्यातील बँकांना सुट्टी

30 नोव्हेंबर गुरु नानक जयंती निमित्त देशातील काही भागात बँकांना सुट्टी

30 नोव्हेंबर या दिवशी देशातील महत्त्वाच्या शहरांपैकी बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना, रायपुर, रांची, शिमला, श्रीनगर याठिकाणी सुट्टी असेल. त्याचप्रमाणे तुमच्या बँकेशी संपर्क केल्यास तुम्हाला या सुट्टीविषयी सविस्तर माहिती मिळू शकेल, जेणेकरून तुमच्या कामाचा खोळंबा होणार नाही.


First published:
October 31, 2020, 12:26 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular