Home लेटेस्ट मराठी न्यूज Maharashtra नेटवर्कची बोंब; होईना ‘वर्क फ्रॉर्म होम’!

नेटवर्कची बोंब; होईना ‘वर्क फ्रॉर्म होम’!


नागरिक वैतागले; कामाचा वाढता मनस्ताप

या समस्यांनी हैराण

– संथ स्पीड असलेल्या नेटवर्कमुळे कॉल ड्रॉप्स

– अनेक भागात रेंजच गायब

– वायफाय सुविधाही पडतेय बंद

– सुरळीत सेवा देण्यासाठी कंपन्यांकडे कर्मचाऱ्यांची कमतरता

म. टा. प्रतिनिधी,

लॉकडाउनमुळे शहरातील मोबाइल, इंटरनेट, वाय-फाय, ब्रॉडबॅण्ड नेटवर्कवरही परिणाम होत असून, वर्क फ्रॉम होमअंतर्गत कामे पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत. अतिशय संथरित्या सुरू असलेल्या नेटवर्कमुळे कॉल ड्रॉप्स आणि इंटरनेटमध्ये अडथळे येत आहेत. बऱ्याच भागात नागरिकांना रेंज मिळत नसल्याने आता नेटवर्कदेखील लॉकडाउन झाल्याची स्थिती शहरात निर्माण झाली आहे.

शहरात नेटवर्क सेवा देणाऱ्या खासगी व सरकारी कंपन्यांचे नेटवर्क विविध भागांत बंद पडत असल्याचे चित्र आहे. यामुळे कॉल ड्रॉप्स आणि कित्येक तास रेंज गायब होण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. याचा परिणाम इंटरनेटवरही होत असून, वर्क फ्रॉम होमच्या काळात गरज असताना, नेटवर्कचा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. लॉकडाउन लागू होऊन दीड महिना उलटता असून, सुरुवातीला नेटवर्क वापरणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने रेंज गायब होण्याचे प्रमाण वाढले. मात्र, या समस्येत सुधारणा होण्याऐवजी वाढ होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. घरात ब्रॉडबँड आणि वायफाय कनेक्शन देणाऱ्या खासगी कंपन्यांच्या सेवाही विस्कळीत झाल्या आहेत. त्या दुरुस्तीचे काम थोड्याफार प्रमाणात सुरू आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने अनेकांच्या घरातील वायफाय सुविधाही बंद पडत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. दरम्यान, रिचार्जमध्ये कोणतीही सूट मिळत नसून, नेटवर्कअभावी डेटाची मुदतही वाढत नाही. यामुळे रिचार्च वाया जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. एकाचवेळी वापर वाढल्यामुळे अडचणी येत असून, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कंपन्यांद्वारे ग्राहकांना सांगण्यात आले आहे.

कर्मचारी हैराण

खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे सुरू आहे. यामुळे बहुतांश कर्मचारी मोबाइल, इंटरनेट डोंगलद्वारे घरूनच काम करीत आहेत. मात्र, सातत्याने नेटवर्क गायब होत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे. तसेच कार्यालयीन मीटिंग व्हिडीओ कॉलद्वारे होत असून, त्यातही कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याचे घरी राहून काम करणाऱ्या अद्वैत कांगणे या नागरिकाने सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular