Home लेटेस्ट मराठी न्यूज 'नातेवाईकांनी जमीन खरेदी केली असतानाही मुख्यमंत्र्यांनी नाणार रद्द केला', शिवसेना खासदाराचा गौप्यस्फोट...

‘नातेवाईकांनी जमीन खरेदी केली असतानाही मुख्यमंत्र्यांनी नाणार रद्द केला’, शिवसेना खासदाराचा गौप्यस्फोट Shivsena mp vinayak raut reaction on cm uddhav thackeray and nanar mhas | News


सुजी कंपनीने रिफानरीसाठी जमीन खरेदी केली असल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी 23 सप्टेंबरला रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन केला होता.

सिंधुदुर्ग, 4 नोव्हेंबर : ‘रिफायनरीसाठी आपल्या नातेवाईकानी जमीन खरेदी केलेली असल्याचं माहीत असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी रद्द करण्याचं धाडस दाखवलं,’ असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांनी सुजी कंपनीच्या माध्यमातून नाणार रिफायनरीसाठी जमीन खरेदी केलेली असतानाही मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी रद्द करण्याचे धाडस दाखवले. हे नारायण राणे करु शकत नाहीत,’ असं स्पष्टीकरणही खासदार राऊत यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांचे मावसभाऊ निशांत देशमुख संचालक असलेल्या सुजी कंपनीने रिफानरीसाठी जमीन खरेदी केली असल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी  23 सप्टेंबरला रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन केला होता.

हेही वाचा – ‘मेट्रो’ची जागा आमचीच, तुमच्या परवानगीची गरज नाही’, आदित्य ठाकरेंची पुन्हा आक्रमक भूमिका

निलेश राणे यांच्या आरोपावर बोलताना विनायक राऊत यांनी निशांत देशमुख यांची वडिलोपार्जित इस्टेट एजन्सी असल्याचं माहीत असतानाही उद्धव ठाकरे यानी रिफायनरी रद्द केल्याचं म्हटलं आहे . नाणार रिफायनरी जमीन खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असून याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले असल्यामुळे लवकरच हा सर्व घोटाळा उघड करु असंही राऊत म्हणाले.

इतकंच काय तर यापुढे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात कुठेही ऑईल रिफायनरी होणे अशक्य असल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. 


Published by:
Akshay Shitole


First published:
November 4, 2020, 10:32 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular