Home लेटेस्ट मराठी न्यूज नशीब काढलं राव! राहण्यासाठी छप्पर नसलेल्या सेल्समनला लागली 7 कोटींची लॉटरी dubai...

नशीब काढलं राव! राहण्यासाठी छप्पर नसलेल्या सेल्समनला लागली 7 कोटींची लॉटरी dubai salesman won 7 crore lottery wants to buy house for family mhpg | Viral


एखाद्याचं नशीब त्याला कधी कोणत्या जागेवरून कुठून घेईल जाईल हे सांगता येत नाही. हे एका भारतीयानं सिद्ध केलं.

दुबई, 07 नोव्हेंबर : एखाद्याचं नशीब त्याला कधी कोणत्या जागेवरून कुठून घेईल जाईल हे सांगता येत नाही. हे एका भारतीयानं सिद्ध केलं. 33 वर्षीय सुनील कुमार कथुरियानं दुबईमध्ये लॉटरी जिंकला. या लॉटरीमध्ये त्याला चक्क 10 लाख युएस डॉलरचे बक्षीस जिंकले. भारतीय रुपयाप्रमाणे ही रक्कम 7 कोटी आहे.

इंडिया टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, सुनील कुमार एका खासगी कंपनीत काम करतात. गेली 12 वर्ष सुनील सेल्समन म्हणून काम करतात. 1 मिलियन डॉलर्स जिंकणारा सुनील 342वा व्यक्ती आहे. सुनीलनं 17 ऑक्टोबर राजी लॉटरीचे तिकिट ऑनलाइन खरेदी केले. डीडीएफ मिलेनियर ड्रॉमध्ये 7 कोटींचे बक्षीस जिंकले. 10 लाख डॉलर्स जिंकणारा सुनील 170वा भारतीय ठरला आहे.

वाचा-18 वर्षीय निलांशीने मोडला स्वत:चाच रेकॉर्ड; लांब केसांसाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

सुनील यांनी बक्षीस जिंकल्यानंतर सांगितले की, गेली अनेक वर्ष ते बहरीनमध्ये राहत आहे. दुबईत गेली 10-12 वर्ष सुनील सेल्समन म्हणून काम करत आहेत. सुनील यांनी सांगितले की, त्यांना हे पैसे चांगल्या कामासाठी वापरायचे आहेत. या पैशातून देगणीही देणार आहे. तसेच त्यांना घरही घ्यायचे आहे.

वाचा-असा WWF चा थरार तुम्ही कधी पाहिला नसेल, 2 उंदरांमधल्या भांडणाचा दुर्मीळ VIDEO

सुनील यांची घरची परिस्थिती ठिक नव्हती, अशातच ही लॉटरी त्यांच्यासाठी फायद्याची ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन लॉटरी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.


Published by:
Priyanka Gawde


First published:
November 7, 2020, 2:36 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular