Home लेटेस्ट मराठी न्यूज धक्कादायक: IPLच्या सट्ट्यात पैसे हरले, मुलाने आईच्या दागिन्यांची केली घरातून चोरी |...

धक्कादायक: IPLच्या सट्ट्यात पैसे हरले, मुलाने आईच्या दागिन्यांची केली घरातून चोरी | News


तेजसनेच पैसे चोरल्याची कबुली दिली. त्याने काही सोनं गहान ठेवलं तर काही सोनं विकलं. तर काही पैसेही रोख दिलेत.

वाशिम 28 ऑक्टोबर: IPL सामन्यांवरचे सट्टे (IPL betting) हे फक्त काही मुंबई, पुण्यात आणि फक्त मेट्रो शहरांमध्येच लावले जात नाहीत. त्याचं लोण आता थेट छोट्या शहरांपर्यंत गेलं आहे. विदर्भातल्या वाशिम जवळच्या मालेगावमधली एक धक्कादायक घटना समोर आल्याने सगळेच हादरून गेले आहेत. सट्ट्यात पैसे हारल्याने एका तरुणाने आपल्या आईचेच दागिने चोरून ते गहाण ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उघड झाल्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे.

वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव शहरातील अर्चना मिश्रा यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यासह 10 हजार रोख रक्कम असा एकूण पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचं आढळून आलं होतं. घरात चोरी झाली आणि पैसे आणि दागिने गेले असं त्यांना वाटतं.

त्यानंतर अर्चना मिश्रा यांनी पोलिसांमध्ये घरफोडी झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता त्यांना अर्चना मिश्रांचा मोठा मुलगा तेजस (22 )  याच्यावर संशय आला. पोलिसांच्या चौकशीत तेजस हा आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावत असल्याचं कळालं. त्यानंतर पोलिसांनी आणखी चौकशी केली.

तेव्हा सट्ट्यावर लावलेले पैसे हरल्याची माहिती दिली. त्यानंतर तेजसनेच पैसे चोरल्याची कबुली दिली. त्याने काही सोनं गहान ठेवलं तर काही सोनं विकलं. तर काही पैसेही रोख दिलेत. पोलिसांनी काही सोनं आणि रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी तेजससह आणखी एकाला अटक केल्याची माहिती मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी दिली.


Published by:
Ajay Kautikwar


First published:
October 28, 2020, 9:00 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular