Home लेटेस्ट मराठी न्यूज ‘देव जरी CM झाले तरी सर्वांना नोकरी देणं अशक्य’ या मुख्यमंत्र्यांनीच घेतली...

‘देव जरी CM झाले तरी सर्वांना नोकरी देणं अशक्य’ या मुख्यमंत्र्यांनीच घेतली तरुणांची शाळा! | National


‘त्यामुळे युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता इतर पर्यायांचा विचार करावा. प्रचंड लोकसंख्ये मुळे नोकरी मागणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे. त्यामुळे सर्वांना नोकरी शक्य नाही.’

पणजी 31 ऑक्टोबर: देशात सध्या रोजगार हा सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न आहे. कोरोनामुळे तर लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्यात. त्यामुळे रोजगारासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे. असं वातावरण असताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant)  यांनी आज तरुणांची शाळाच घेतली. फक्त सरकारी नोकरीच्या (Government Jobs)  मागे लागू नका. स्वयंरोजगार कसा निर्माण होईल त्याची काळजी घ्या असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.

सावंत म्हणाले, तरुणांनी आता सरकारी नोकरींच्या मागे लागू नये. कारण जागा मर्यादीत असतात. साक्षात देवाला जरी मुख्यमंत्री केले तरी सर्वांना नोकरी देणं शक्य नाही. कारण शेवटी सरकारलाही नोकरी देण्यासाठी मर्यादा असतात. त्यामुळे युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता इतर पर्यायांचा विचार करावा असंही ते म्हणाले.

गोवा सरकारने राज्यात स्‍वयंपूर्ण मित्र हा उपक्रम सुरू केला आहे. यात नेमून दिलेला सरकारी अधिकारी पंचायत स्तरावर जावून सरकारी योजना योग्य पद्धतीने राबविल्या जातता की नाही हे बघणार आहे आणि रोजगाराची निर्मिती कशी होईल त्याचीही तो काळजी घेणार आहे.

सरकारी नोकऱ्यांमुळे सरकारवर प्रचंड आर्थिक ताण येतो आहे. सरकारच्या उत्त्पन्नाचा मोठा हिस्सा हा कर्मचाऱ्यांच्या पगारांवर खर्च होतो त्यामुळे विकासासाठी पैसैे उरत नाही असं सांगितलं जातं. त्यातच सरकार पेंशन आणि इतर अनेक सुविधाही देत असतं. त्याचाही प्रचंड ताण सरकारच्या तिजोरीवर येत असतो.

राज्यात गेल्या 6 महिन्यात सर्वात कमी मृत्यूची नोंद, Recovery Rate 90 टक्के

अनेक सरकारी खात्यांमध्ये भरमसाठ नोकर भरती करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या विभागाचा सगळा पैसा हा फक्त पगारांवरच खर्च होतो. त्यामुळे. एवढच नाही तर UPSC आणि राज्य सरकारच्या सेवांमध्येही नोकर भरतीचं प्रमाण कमी झालं आहे. प्रचंड लोकसंख्ये मुळे नोकरी मागणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे. त्यामुळे सर्वांना नोकरी शक्य नाही असं म्हटलं जातं.


Published by:
Ajay Kautikwar


First published:
October 31, 2020, 8:27 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular