Home लेटेस्ट मराठी न्यूज दिवाळीत स्वत:ला द्या मोबाइलची ट्रीट; चक्क 27,695 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा...

दिवाळीत स्वत:ला द्या मोबाइलची ट्रीट; चक्क 27,695 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा भारी स्मार्टफोन | Auto-and-tech


यंदाची दिवाळी तर थाटातच साजरी करा…

मुंबई, 9 नोव्हेंबर : दिवाळी तर तोंडावर आली आहे. त्यामुळे सध्या घरात वातावरण दिवाळीमय झालं आहे. कोणाला काय गिफ्ट द्यायचं..याची चर्चाही सुरू झाली आहे. सर्वांना तर गिफ्ट करालच पण यंदाच्या दिवाळीत सॅमसंगने एक भन्नाट सवलत दिली आहे. सॅमसंगचा हा भारी फोन खरेदी करताना तुम्हाला चक्क 27695 रुपये वाचवता येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 च्या (Samsung Galaxy Note 10) किमतीत मोठी घट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फोनच्या किंमतीत झालेली घट भारतातील रिटेल स्टोर्सवर झाली आहे. याची माहिती 91 मोबाइल्सद्वारा मिळाली आहे. 2019 मध्ये लॉन्च झालेला हा फ्लॅगशिप फोन 27,695 रुपयांनी स्वस्त झाला आहे. गॅलेक्सी नोट 10 मध्ये Exynos 9825, Infinity-O Dynamic AMOLED डिस्प्ले, 12 मेगापिक्सल कॅमेरा आणि S-Pen सपोर्टसह येतो.

गॅलेक्सी नोट 10 भारतात 69,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता, मात्र हा फोन सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाइटवर 57,100 रुपयांमध्ये उपलब्ध केला आहे. ऑफलाइन रिटेल स्टोअरवर सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 आता 45,000 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार किमतीतमध्ये केलेली घट Auro Red कलरशिवाय फोनच्या सर्व कलर्ससाठी आहे.

ऑनलाइन सेगमेंटमध्ये गॅलेक्सी नोट 10 ची किंमतीत काही बदल झालेला नाही आणि सॅमसंग वेबसाइटवर याची किंमत 57,100 रुपये इतकी आहे. अॅमेझॉनवर फोनची किंमत 73,600 रुपयांमध्ये आहे.

हे ही वाचा-हे ‘2’ शब्द ऐकताच 62 दिवसानंतर कोमातून बाहेर आला तरुण; डॉक्टरही झाले हैराण

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 च्या फिचर्सविषयी सांगायचा झाल्यास यात Infinity-O Dynamic AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कॅमेऱ्याबद्दल सांगायचं झाल्यास फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आहे. यानंतर 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेंस आणि 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेंस देण्यात आला आहे.

सेल्फीसाठी या फोनमध्ये 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमरा देण्यात आला आहे. याशिवाय फोकस व्हिडीओ, झूम इन माइक, सुपर स्टीडी, हाइपरलेप्स, एआर डूडल आणि नाइट मोड सारखे अनेक खास फिचर्स आहेत. सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 मध्ये पॉवरसाठी 3,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जे 25 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येते.


Published by:
Meenal Gangurde


First published:
November 9, 2020, 8:17 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular