Home मनोरंजन "दिनानाथ नाट्यगृहाच्या डागडुजीचे पैसे पाण्यात" 16 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अमेय खोपकरांचा आरोप...

“दिनानाथ नाट्यगृहाच्या डागडुजीचे पैसे पाण्यात” 16 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अमेय खोपकरांचा आरोप mns-ameya-khopkar-tweet-on-dinanath-natyagruh-renovation-mhaa | News


विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहाच्या डागडुजीमध्ये 16 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी केला आहे.

मुंबई, 08 नोव्हेंबर: मुंबईच्या विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहाच्या डागडुजीच्या निधीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आला आहे. यासंदर्भात मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसंच दिनानाथ नाट्यगृहातील डागडुजीचे काही फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.

अमेय खोपकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे, “मुंबई महापालिकेने 5 वर्षापूर्वी तब्बल 16 कोटी रुपये खर्च करुन डागडुजी केलेल्या दीनानाथ नाट्यगृहाची अवस्था बघा. डागडुजीच्या नावाखाली महापालिकेने नक्की कोणाचे खिसे गरम केले?” अमेय खोपकर यांनी पोस्टमध्ये आरोप केला आहे, “खरंतर 16 कोटी रुपयांमध्ये नवीन नाट्यगृह बांधून झालं असतं. पण इतके पैसे खर्च करुनही तकलादू काम केलं आहे. सध्याचं काम कधी सुरू होऊन कधी संपणार? हे सुद्धा माहित नाही. मग कलाकरांच्या पाठिशी उभं राहण्याचं नाटक सरकार का करतंय? असा सवालही अमेय खोपकर यांनी विचारला आहे. “अशा वास्तूत नाट्यप्रयोगांना परवानगी देऊन सरकार काय साध्य करू पाहतंय?” असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे. नाट्यगृहातील शौचालयांची अवस्थादेखील अतिशय वाईट असल्याचं पोस्टमध्ये लिहीलं आहे.

अमेय खोपकर यांची फेसबुक पोस्ट मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आणि अमेय खोपकर यांच्या ट्विटर हँडलवरही शेअर करण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेकडून या विषयी काय उत्तर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


Published by:
Amruta Abhyankar


First published:
November 8, 2020, 2:30 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular