Home लेटेस्ट मराठी न्यूज India दहशतवाद्यांच्या रडारवर भाजप, युवा मोर्चाच्या महासचिवासह तिघांची गोळ्या घालून हत्या jammu kashmir...

दहशतवाद्यांच्या रडारवर भाजप, युवा मोर्चाच्या महासचिवासह तिघांची गोळ्या घालून हत्या jammu kashmir 3 bjp workers killed in terrorist attack mhkk | National


कलम 370 हटवल्यानंतर मुद्दा गरम असतानाच दहशतवाद्यांच्या रडारवर BJP असल्याचं दिसत आहे. याचं कारण म्हणजे 6 महिन्यांत जवळपास भाजपच्या 14 नेत्यांची हत्या करण्यात आली आहे.

श्रीनगर, 30 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीरमधून सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी येत आहे. कुलगाम जिल्ह्यात भाजप युवा मोर्चाच्या महासचिवासह 3 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. कुलगाम जिल्ह्यातील पोरा गावात रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची जबाबदारी लष्कर-ए-तोयबा (Lashkar-E-Taiba) समर्थक दहशतवादी संघटना ‘रेझिस्टंट फ्रंट’ (TRF) यांनी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध आणि दुःख व्यक्त केलं. पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “माझ्या तीन तरुण कार्यकर्त्यांच्या हत्येचा मी निषेध करतो. जम्मू-काश्मीरमध्ये चांगले काम करत होते.”

या घटनेनंतर TRF संघटनेकडून असे आणखीन हल्ले करण्यात येतील अशी थेट धमकीच दिली आहे. या घटनेमुळे कुलगाम जिल्हा हादरला असून सध्या या परिसरात खळबळ उडाली आहे. वाईके पोरा भागातून भाजप युवा मोर्चाच्या महासचिवाची गाडी जात असताना दहशतवाद्यांनी आधी कार्यकर्त्यांवर हल्ला केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या सगळ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत भाजपच्या तीन कार्यकर्त्यांनी प्राण सोडले होते.

हे वाचा-उल्हासनगरमध्ये भाजपला दुसरा मोठा धक्का, नगरसेवकाने केली शिवसेनेशी हातमिळवणी

कलम 370 हटवल्यानंतर मुद्दा गरम असतानाच दहशतवाद्यांच्या रडारवर BJP असल्याचं दिसत आहे. याचं कारण म्हणजे 6 महिन्यांत जवळपास भाजपच्या 14 नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. कलम 370 हटवल्यानंतर मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला यांनी देखील सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. या मुद्द्यावरून भाजप विरुद्ध मुफ्ती असा वाद जम्मू-काश्मीरमध्ये सुरू आहे.

काश्मीरमध्ये वसीम बारीच्या हत्येनंतर अनेक नेत्यांनी राजीनामा देण्यास सुरवात केली. काश्मीरमधील अनेक नेत्यांनी सोशल साइट्सद्वारे राजीनामा जाहीर केला होता. केंद्रशासित प्रदेशात सत्ताधारी पक्ष असलेल्या नेत्यांवरचे हल्ले वाढल्यानं खळबळ उडाली आहे. जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात अतिरेक्यांनी गोळीबार केल्याने जुलैमध्ये भाजप नेते शेख वसीम बारी आणि त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाला होता. बारी पूर्वी भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते.


Published by:
Kranti Kanetkar


First published:
October 30, 2020, 7:52 AM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular