Home लेटेस्ट मराठी न्यूज दया तोड दो ये दरवाजा - दार उघड बयेचं भन्नाट कॉम्बिनेशन; मीमवर...

दया तोड दो ये दरवाजा – दार उघड बयेचं भन्नाट कॉम्बिनेशन; मीमवर नेटकऱ्यांच्या अतरंगी कॉमेंट्स Tod-do-ye-darwaja-daar-ughad-baye-daar-ughad-youtube-india-shared-interesting-meme-mhaa | News


दरवाजा उघडण्याचे मार्ग किती? सोशल मीडियावर होम मिनिस्टर आणि सीआयडीच्या लोकप्रिय संवादाचं मीम व्हायरल होत आहे.

मुंबई, 21 नोव्हेंबर: दार उघड बये दार उघड….या एका वाक्याने अनेक गृहिणी धावत टीव्हीसमोर येऊन बसतात. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या तमाम गृहिणींना हसवणारा, त्यांची दु:ख आणि आनंद वाटून घेणारा एकमेव कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर. आणि दुसरीकडे दया तोड दो ये दरवाजा.. हा संवाद ऐकला की आपल्यातलाही पोलीस जागा करणारा एक कार्यक्रम म्हणजे सीआयडी. गेल्या अनेक वर्षांपासून सीआयडीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे.

आज आम्ही तुम्हाला या संवादांची आठवण करुन देत आहोत त्याला कारणही तसंच आहे. यूट्यूब इंडियाने या दोन कार्यक्रमांसंदर्भात एक मीम शेअर केलं आहे. त्यामध्ये आदेश बांदेकर आणि इन्स्पेक्टर दया म्हणजे दयानंद शेट्टी यांचा फोटो शेअर केला आहे. आणि या लिहीलं आहे की, दरवाजा उघडण्याचे फक्त 2 मार्ग आहेत. यूट्यूब इंडियाने शेअर केलेल्या फोटो या मीमला अनेक भारतीय भन्नाट रिप्लाय देत आहेत. या पोस्टला 1 दिवसात 1 हजाराच्यावर लाइक्सही आले आहेत.

गेली अनेक वर्ष होम मिनिस्टर आणि सीआयडी या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.


Published by:
Amruta Abhyankar


First published:
November 21, 2020, 10:07 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular