Home लेटेस्ट मराठी न्यूज ...तर घरगुती पदार्थ विकणं पडणार महागात; 5 लाख रुपये दंड आणि 6...

…तर घरगुती पदार्थ विकणं पडणार महागात; 5 लाख रुपये दंड आणि 6 महिने कारावास Homemade Food business during Lockdown Can Now be Fined Rs 5 Lakh for Not Having Licence mhpl | National


कोरोना लॉकडाऊनच्या (corona lockdown) काळात तुम्हीदेखील घरगुती पदार्थ बनवून विकणं (homemade food) सुरू केलं असेल तर तुम्हालाही आता या अटी आणि नियमांचं पालन करावं लागणार आहे.

मुंबई, 30 ऑक्टोबर : कोरोना लॉकडाऊनच्या (corona lockdown) काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. कित्येक जण बेरोजगार झाले. उदरनिर्वाहासाठी वेगवेगळे मार्ग शोधू लागले. अशात हॉटेल, रेस्टॉरंट बंद असल्यानं कित्येकांना उत्तम संधी मिळाली. घरगुती पदार्थ (homemade food) तयार करून त्यांची विक्री होऊ लागली. लोक घरात पदार्थ बनवून त्याची होम डिलीव्हरी करू लागले आणि लॉकडाऊनच्या काळात याला मोठ्या प्रमाणात मागणीही होती.

कोरोना लॉकडाऊनमध्ये अगदी सुशिक्षित लोकंही खाद्यपदार्थ बनवून विकू लागले. कुणी कांदेपोहे-उपमा-इडली-डोसा असा नाश्ता पुरवणं सुरू केलं. कुणी पोळीभाजी विक्री सुरू केलं. कुणी पुरणपोळी-लाडू असे गोड पदार्थ विकायला सुरुवात केली, कुणी होममेड चॉकलेट्स-केकची ऑर्डर घेऊ लागलं. अशा या घरगुती पदार्थांच्या व्यवसायामुळे अनेकांचं नशीब खुललं. नोकरी नसली तरी पैसा मिळू लागला. मात्र आता हाच व्यवसाय महागात पडणार आहे.

तुम्ही सुरू केलेल्या घरगुती खाद्यपदार्थ व्यवसायाची तुम्ही नोंदणी केली आहे का? तुमच्याकडे याचं लायसेन्स आहे का?तुम्ही नोंदणी केली नसेल आणि तुमच्याकडे लायसेन्स नसेल तर मग तुम्हाला पाच लाख रुपये दंड भरावा लागेल किंवा सहा महिन्यांचा जेलही होईल. राज्याचं अन्न आणि औषध प्रशासन ही कारवाई करेल.

हे वाचा – खाण्यासाठी काय करायचं याचं उत्तर देणार टेबलक्लॉथ; साहित्य ओळखून सूचवणार पदार्थ

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाच्या (Food Safety and Standards Authority of India) नियमांनुसार ही कारवाई केली जाणार आहे. एफएसएसएआयच्या (FSSAI) कायद्यानुसार कोणतंही रेस्टॉरंट ज्यांचा व्यवसाय  12 लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांच्याकडे लायसेन्स असण्याची गरज आहे. यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यावसायिकांकडे किमान नोंदणी असायला हवी. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार मार्चपासून अशा फक्त  2300 नोंदणी झाल्या आहेत, प्रत्यक्षात यापेक्षा अधिक लोकांनी हा व्यवसाय सुरू केला आहे.

हे वाचा – चहाप्रेमी हा चहा घेणार का? 75000 रुपये किलोने झाली विक्री, वाचा काय आहे खासियत

होम किचन म्हणजे जिथं ग्राहकांना अन्न सुरक्षा नियमाचं पालन केलं जातं आहे की नाही याची माहिती नसतं. खाद्यपदार्थ कसे बनवले जात आहे, त्यांच्यासाठी कोणते पदार्थ वापरले जात आहेत हे समजत नाही. त्यामुळेच असा निर्णय घेण्यात आला आहे.


Published by:
Priya Lad


First published:
October 30, 2020, 4:23 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular