Home शहरं Mumbai तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पॉर्न साइटवर टाकायचा व्हिडिओ, असं फुटलं बिंग.. |...

तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पॉर्न साइटवर टाकायचा व्हिडिओ, असं फुटलं बिंग.. | Crime


पॉर्न व्हिडिओतून आरोपीनं कमावले हजारो डॉलर…

मुंबई, 1 नोव्हेंबर: नोकरीचं आमिष दाखवून महिला तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्यांची लैंगिक शोषण करणाऱ्या एका भामट्याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आरोपी तरुणींचे व्हिडिओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

मिलिंद झाडे असं आरोपीचं नाव असून तो आरोपी ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्टमध्ये (टीएमटी) बस कंडक्टर म्हणून कार्यरत आहे.

हेही वाचा.. पुणे लष्करी भरती रॅकेट! परीक्षेत पास करून देण्याचं आमिष दाखवून तरुणांना गंडवलं

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी मिलिंद झाडे यानं ‘शिव वैशाली’ नावाची एक वेबसाइट सुरू केली होती. त्यावर तो पॉर्न कंटेंट अपलोड करत होता. एवढंच नाही तर पॉर्न व्हिडिओ पाहण्यासाठी तो इंटरनेट यूजर्स कडून आकारत होता. क्राईम ब्रांचला या वेबसाइट अनेक तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले आहे.

पॉर्न व्हिडिओतून आरोपीनं कमावले हजारो डॉलर…

आरोपीनं पॉर्न व्हिडिओतून आतापर्यंत हजारो डॉलर कमावले आहेत. अनेक महिलांना लाखो रुपये पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून आरोपी आपल्या जाळ्यात ओढत होता.

पीडित तरुणींपैकी एका पिझ्झा स्टोअरमध्ये काम करणाऱ्या तरुणीला लाखो रुपयांची नोकरी देण्याचे आमिष दाखवून आरोपीने शारिरीक संबंध बनवले. नंतर तिचा व्हिडिओ वेबसाइटवर अपलोड केला. हा व्हिडिओ तरुणीच्या एका नातलगाने पाहिला आणि त्यानंतर या प्रकरण उघडीस आलं.

हेही वाचा…मिस्टर परफेक्शनिस्टविरोधात तक्रार; भाजप नेता म्हणतो, ‘हा नियम मोडला’

आरोपी कंडक्टरविरोधात विक्रमगड पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तपास करत असताना अजून काही तरुणींचे आरोपीने लैंगिक शोषण केल्याचे क्राइम ब्रांचला समजले. यानंतर दुसऱ्या एका तरुणीने वालीव पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.


Published by:
Sandip Parolekar


First published:
November 1, 2020, 8:40 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular