Home लेटेस्ट मराठी न्यूज ड्रग्ज प्रकरणात अर्जुन रामपालभोवती NCB ने आवळला फास; घरावर धाडीनंतर आता बजावला...

ड्रग्ज प्रकरणात अर्जुन रामपालभोवती NCB ने आवळला फास; घरावर धाडीनंतर आता बजावला समन्स narcotics control bureau summons actor arjun rampal after raid at his house mhpl | News


अभिनेता अर्जुन रामपालला (Arjun Rampal) आता ड्रग्ज प्रकरणात एनसीबीला (NCB) सामोरं जावं लागणार आहे.

मुंबई, 09 नोव्हेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलनं तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) निशाण्यावर आता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आला आहे. मुंबईतील त्याच्या घरावर धाड टाकल्यानंतर आता एनसीबीने त्याला समन्स बजावला आहे. ड्रग्ज प्रकरणात आता एनसीबी अर्जुनचीही चौकशी करणार आहे.

अंमली विरोधी पथकाने आज सकाळी अर्जुन रामपालच्या अंधेरी आणि वांद्रे येथील घरावर कारवाई केली आहे. आता त्याला समन्स बजावण्यात आल्याचं ट्वीट एएनआयनं केलं आहे. अर्जुनला 11 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.

याआधी एनसीबीने ड्रग्स बाळगणे आणि खरेदी करण्याप्रकरणी अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएला डिमेट्रिएड्सचा भाऊ अगिसियालोस याला ताब्यात घेतले होते. त्याला काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. पण पुन्हा एकदा एनसीबीने अगिसियालोसला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शिवाय त्याच्या ड्रायव्हरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.

हे वाचा – NUDE PHOTO वरून झाला ट्रोल; आता मिलिंद सोमणनं शेअर केला नवा VIDEO

एनसीबीच्या टीमने अनेक फिल्मी स्टार्स, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरी छापे मारले. मुंबईतील लोखंडवाला, मालाड, अंधेरी आणि नवी मुंबई परिसरातही रविवारी छापेमारी करण्यात आली होती. शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरातून ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. कारवाईमध्ये 10 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. नाडियाडवाला यांचा फोनही एनसीबीने जप्त केला आहे. एनसीबीने छापा मारला तेव्हा नाडियाडवाला घरात नव्हते. रविवारीच  ड्रग्ज कनेक्शनमध्ये निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीलाही एनसीबीने अटक केली.

हे वाचा – पॉर्न स्टार्सनी नॅशनल पार्कमध्ये शूट केले अश्लील व्हिडीओ; कारवाईची मागणी

याआधी ड्रग्स प्रकरणी  अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), रकुल प्रीत सिंग(Rakul Preet Singh), सारा अली खान (Sara Ali Khan) यांची नावं ड्रग केसमध्ये समोर आल्यानंतर आता निर्माते फिरोज नाडियाडवाला आणि त्यांची पत्नी एनसीबीच्या रडारवर आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये या अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली होती.


Published by:
Priya Lad


First published:
November 9, 2020, 5:50 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular