Home लेटेस्ट मराठी न्यूज डोकेदुखीचं औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरणार? COVID-19 उपचारात दिलं जाणार Aspirin Aspirin...

डोकेदुखीचं औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरणार? COVID-19 उपचारात दिलं जाणार Aspirin Aspirin will be tested as potential COVID-19 drug in UK study mhpl | Coronavirus-latest-news


सर्वत्र उपलब्ध असलेलं स्वस्त असं Aspirin औषध कोरोना रुग्णांसाठी प्रभावी आणि सुरक्षित आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे.

लंडन, 06 नोव्हेंबर : कोरोना रुग्णांवर (corona patient) सध्या वेगवेगळ्या औषधांचं ट्रायल सुरू आहे. यापैकी काही औषधं प्रभावी असल्याचं दिसतं आहे. दरम्यान आता सर्वसामान्यपणे वापरलं जाणारं Aspirin हे औषधही कोरोना रुग्णांना दिलं जाणार आहे. यूकेमध्ये (UK) या औषधाचं कोरोना रुग्णांवर व्यापक स्तरावर ट्रायल होणार आहे.

हृदयाच्या समस्या असल्यास अॅस्पिरीन हे औषध दिलं जातं. हे औषध रक्त पातळ करतं त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या झाल्यास हे औषध डॉक्टर देतात. शिवाय पेनकिलर म्हणूनही या औषधाचा वापर केला जातो. डोकेदुखी आणि अंंगदुखीसाठी अॅस्पिरीन घेतलं जातं. मात्र आता हेच औषध कोरोना रुग्णांच्या उपचारासाठीही वापरलं जाणार आहे.

कोरोना रुग्णांमध्ये हायपर रिअॅक्टिव्ह प्लेटलेट्सची समस्या उद्भवते. त्यामुळे त्यांना ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका जास्त असतो. अॅस्पिरिनमध्ये अँटिप्लेटलेट घटक असतो जो रक्ताच्या गुठळ्या होणयापासून रोखतो. त्यामुळे कोरोनाच्या उपचारात अॅस्पिरीन औषधाचा समावेश केला जाणार आहे.

यूकेमध्ये या औषधाचं कोरोना रुग्णांवर ट्रायल घेतलं जाणार आहे. कमीत कमी 2,000 कोरोना रुग्णांना तरी हे औषध दिलं जाणार आहे. इतर औषधांसह या औषधाचा दररोज 150 mg डोस दिला जाणार आहे. यानंतर या रुग्णांची इतर रुग्णांशी तुलना केली जाणार आहे.

संशोधनाचे अभ्यास पीटर होर्बे म्हणाले, अॅस्पिरीन हे फायदेशीर आणि सुरक्षित आहे. शिवाय हे औषध स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध आहे. त्यामुळे जर हे ट्रायल यशस्वी झालं, तर हे औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरेल. कारण कोरोना रुग्णांना होणारा धोका टाळता येईल.


Published by:
Priya Lad


First published:
November 6, 2020, 6:33 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular