Home लेटेस्ट मराठी न्यूज डोंबिवलीतील थरारक घटना, मार्शल तरुणीने दारुड्याच्या पोटात खुपसली चावी, VIDEO | Maharashtra

डोंबिवलीतील थरारक घटना, मार्शल तरुणीने दारुड्याच्या पोटात खुपसली चावी, VIDEO | Maharashtra


डोंबिवलीत सकाळी 8.30 च्या सुमारास सावरकर रोडवर ही घटना घडली आहे.

डोंबिवली, 22 ऑक्टोबर : डोंबिवलीमध्ये कचरा रस्त्यावर टाकण्याच्या वादातून एका व्यक्तीने मार्शल तरुणीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रतिकार करण्यासाठी या तरुणीने धारदार वस्तूने या व्यक्तीला भोसकून काढले आहे, भररस्त्यावर ही थरारक घटना घडली आहे.

डोंबिवलीत सकाळी 8.30 च्या सुमारास सावरकर रोडवर ही घटना घडली आहे.  सदरील व्यक्तीने दारू प्यायलेला होता. त्याने रस्त्यावर कचरा टाकला होता. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेची मार्शल तरुणीने या व्यक्तीला हटकले.

त्यानंतर या व्यक्तीने मार्शल तरुणीलाच शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, दारूच्या नशेत असलेल्या या व्यक्तीने तरुणीला मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या या तरुणी बचावासाठी या व्यक्तीच्या पोटात चावी मारली. त्यामुळे त्याच्या पोटाला इजा झाली. भर रस्त्यावर हा वाद सुरू होता.

स्थानिक लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर या व्यक्तीला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.  त्यांच्यावर रुक्मिणी बाई रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.  याप्रकरणी अधिक तपास सुरू असे रामनगर पोलिसाने सांगितले.


Published by:
sachin Salve


First published:
October 22, 2020, 3:21 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular