Home लेटेस्ट मराठी न्यूज डोंबिवलीकरांसाठी दिलासादायक बातमी, स्टेशनवर सुरू झाले महत्त्वाचे काम | News

डोंबिवलीकरांसाठी दिलासादायक बातमी, स्टेशनवर सुरू झाले महत्त्वाचे काम | News


कल्याण दिशेकडील असलेला हा पादचारी पूल 40 वर्षांपूर्वीचा होता. रेल्वेने या पुलाची पाहणी करून पूल धोकादायक असल्याने तोडण्याचे आदेश दिले होते.

डोंबिवली, 17 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमध्ये मुंबईतील लोकल सेवाही बंद आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीच्या कामाचा सपाटा लावण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून डोंबिवली रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचे रखडलेल्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे.  त्यामुळे डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकारील कल्याण दिशेकडील पादचारी पूलाचे काम गेल्या वर्षापासून रखडले होते. अखेर रेल्वे प्रशासनाने आज 17 मे रोजी गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. आज 8 गर्डर टाकण्यात आले आहे.

हेही वाचा –पुण्यातल्या कंपनीने शोधली कोरोनावर 3 औषधं, व्हायरसला रोखण्याचा दावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प आहे. ही संधी साधून रेल्वे प्रशासनाने डोंबिवली रेल्वे स्थानकावर कल्याण दिशेकडील पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यापूर्वी 5 व 6 क्रमांकावरील पुलाचा सांगाडा काढण्यात आला होता. मात्र, अचानक लॉकडाउन लागू झाल्यामुळे हे काम खोळंबले होते.

धोकादायक झालेला पूल 4 मीटर रुंदीचा होता. आता तो 9 मीटर रुंद करण्यात येणार आहे. कल्याण दिशेकडील असलेला हा पादचारी पूल 40 वर्षांपूर्वीचा होता. रेल्वेने या पुलाची पाहणी करून पूल धोकादायक असल्याने तोडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता त्याजागी नवा पूल उभारण्यात येणार असल्याचं रेल्वे सूत्रांनी सांगितलं.

हेही वाचा – पुण्यात चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर केले चाकूने सपासप वार

मागील वर्षी हा पूल हटवण्यात आला होता. त्यामुळे मुंबईच्या दिशेनं जाणारे दोन पादचारी पुलाचा वापर होत होता. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. तसंच डोंबिवली पूर्व भागातून आलेल्या चाकारमान्यांना हा पूल नसल्यामुळे पुढील पुलापर्यंत येण्यासाठी पायपीट करावी लागत होती. अखेर या पुलाचे काम आता सुरू झाले आहे. त्यामुळे लॉकडाउननंतर जेव्हा लोकल सेवा पूर्वपदावर येईल, त्याचा फायदा नक्कीच डोंबिवलीकरांना होईल.

संपादन – सचिन साळवे

First Published: May 17, 2020 05:32 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular