Home लेटेस्ट मराठी न्यूज India ट्विटरवर #BoycottAmazonचा ट्रेंड; हिंदू देवतांची चित्र, ओमचा वापर अंतर्वस्त्र आणि डोअरमॅटवर boycott-amazon-hashtag-trending-on-twitter-for-amazon-hurt-sentiments-of-hindu-people-mhaa...

ट्विटरवर #BoycottAmazonचा ट्रेंड; हिंदू देवतांची चित्र, ओमचा वापर अंतर्वस्त्र आणि डोअरमॅटवर boycott-amazon-hashtag-trending-on-twitter-for-amazon-hurt-sentiments-of-hindu-people-mhaa | Viral


Amazonवर हिंदू देव-देवतांची चित्र टी-शर्ट आणि अंतर्वस्त्रांसाठी वापरण्यात आल्याने देशभरातील लोकांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. ट्विटरवर #BoycottAmazon हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला आहे.

मुंबई, 10 नोव्हेंबर: देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनवर (Amazon) नेटकरी चांगलेच संतापले आहेत. हिंदू देव-देवतांची चित्र टी-शर्ट आणि अंतर्वस्त्रांसाठी वापरण्यात आल्याने देशभरातील लोकांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. अ‍ॅमेझॉनने ओम लिहलेले डोअरमॅटही विक्रीसाठी काढले आहेत. यामुळे नेटकरी चांगलेच संतापले आहेत. ट्वीटरवर सध्या बॉयकॉट अ‍ॅमेझॉन (#BoycottAmazon) हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला आहे.

या कपड्यांमध्ये टू पीस बिकीनी आणि महिलांच्या स्कार्फचाही समावेश आहे. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे एलजीबीटी कम्युनिटीसाठीच्या कपड्यांसाठी हिंदू देवी-देवता दाखवण्यात आल्या आहेत. असले टी-शर्ट पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. ऑनलाइन खरेदीसाठी अ‍ॅमेझॉनपेक्षा फ्लिपकार्ट (Flipcart)चा वापर करा असं आवाहन नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. लोकं अ‍ॅमेझॉनचे  CEO Jeff Bezos यांना टॅग करुन स्क्रीनशॉट शेअर करत आहेत.

अ‍ॅमेझॉनवरील मीम्सचा धुमाकूळ

एकीकडे बॉयकॉट अ‍ॅमेझॉन अशी ट्विट्स व्हायरल होत असतानाच दुसरीकडे अ‍ॅमेझॉनवर वेगवेगळी मीम्सही येत आहेत. ही मीम्स अनेक जण शेअर करत आहेत.

हिंदू देव-देवतांची चित्र टी-शर्ट आणि अंतर्वस्त्रांसाठी वापरल्यामुळे अ‍ॅमेझॉनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारत हे अ‍ॅमेझॉनसाठी मोठं मार्केट आहे. पण अशाप्रकारच्या कपड्यांमुळे अ‍ॅमेझॉनने हिंदू लोकांचा राग ओढवून घेतला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत अ‍ॅमेझॉनच्या व्यवसायावर मोठा परिणाम होईल अशी चर्चा आहे.


Published by:
Amruta Abhyankar


First published:
November 10, 2020, 3:49 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular