Home लेटेस्ट मराठी न्यूज टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, आता बॉल BCCIच्या कोर्टात |...

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, आता बॉल BCCIच्या कोर्टात | News


क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्स सरकारने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला हिरवा कंदील दिला आहे. भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्याची (India tour of Australia) सुरुवात सिडनी आणि कॅनबेरामधून करेल.

मुंबई : क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्स सरकारने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला हिरवा कंदील दिला आहे. भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्याची (India tour of Australia) सुरुवात सिडनी आणि कॅनबेरामधून करेल. या दौऱ्यातल्या पहिल्या दोन वनडे 27 आणि 29 नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये होतील, तर तिसरी वनडे आणि पहिला टी-20 सामना कॅनबेरामध्ये होईल, यानंतर सीरिजच्या शेवटच्या दोन टी-20 पुन्हा सिडनीमध्ये खेळवल्या जातील.

27 नोव्हेंबरपासून वनडे सीरिज

कोरोना संकटाच्या काळात भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. या दोन्ही देशांमध्ये 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमधली पहिली मॅच डे-नाईट टेस्ट ऍडलेडमध्ये खेळवली जाईल. याचसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिजही होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या संपूर्ण दौऱ्याचा कार्यक्रम तयार केला आहे.

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम युएईमधूनच ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. प्रस्तावित वेळापत्रकानुसार 25-30 नोव्हेंबरदरम्यान वनडे सीरिज खेळवली जाईल, तर 4-8 डिसेंबरमध्ये टेस्ट सीरिज होईल. यानंतर भारतीय टीम पिंक-बॉलने सराव सामना खेळेल. यानंतर लगेचच भारतीय टीम परदेशात पहिल्यांदाच डे-नाईट टेस्ट मॅच खेळणार आहे.

टेस्ट सीरिजचं वेळापत्रक

पहिली टेस्ट मॅच ऍडलेडला 17-21 डिसेंबरला, दुसरी बॉक्सिंग डे टेस्ट 26 डिसेंबर ते 30 डिसेंबरला मेलबर्नमध्ये, नवीन वर्षाची पहिली टेस्ट 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये आणि शेवटची टेस्ट मॅच 15 जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये होईल.

इतिहास घडवण्याची संधी

भारताने मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 2018 साली इतिहास घडवला होता. विराटच्या नेतृत्वात खेळलेल्या टीम इंडियाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकली होती. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताचा 2-1 ने विजय झाला होता. याआधी भारताला ऑस्ट्रेलियामध्ये कधीही टेस्ट सीरिज जिंकता आली नव्हती.


Published by:
Shreyas


First published:
October 22, 2020, 7:35 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular