Home लेटेस्ट मराठी न्यूज जावेद अख्तर कंगनाविरोधात कोर्टात, वाचा नेमकं काय आहे प्रकरण..! javed-akhtar-file-complaint-against-kangana-ranaut-mhaa | News

जावेद अख्तर कंगनाविरोधात कोर्टात, वाचा नेमकं काय आहे प्रकरण..! javed-akhtar-file-complaint-against-kangana-ranaut-mhaa | News


सुप्रसिद्ध गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी कंगनाला कोर्टात खेचलं आहे. नेमकं काय प्रकरण आहे. जाणून घ्या

मुंबई, 03 नोव्हेंबर:  कंगना रणौत (Kangana Ranaut)च्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. कंगनाने अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर जावेद अख्तर यांच्यावर आरोप केले होते. त्याला उत्तर देत जावेद अख्तर यांनी आता कोर्टामध्ये धाव घेतली आहे.

काय आहे प्रकरण?

कंगना आणि हृतिक रोशन यांच्यातला वाद तर सर्वज्ञातच आहे.कंगनाने जावेद अख्तर यांच्याविरोधात एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये काही गौप्यस्फोट केले होते. कंगना रणौत म्हणाली होती, “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं आणि सांगितलं की, हृतिक रोशन आणि राकेश रोशन ही मोठी माणसं आहेत. जर तू त्यांच्या माफी मागितली नाहीस तर तुझ्या करिअरसाठी ते धोकादायक होऊ शकतं. ते तुला तुरुंगात टाकतील. तुझं आयुष्य बरबाद होईल. तुला आत्महत्याच करावी लागेल. अशा शब्दामध्ये जावेद अख्तर यांनी मला धमकी दिली होती. ते माझ्यावर एवढे ओरडत होते की, मी घाबरुन थरथर कापयला लागले होते.”जावेद अख्तर यांनी मला अशा धमक्या दिल्या हे कंगनाने अनेकदा मीडियासमोर सांगितलं आहे.

कंगनाच नाही तर तिची बहिण रंगोलीनेदेखील अनेकदा सोशल मीडियावरुन जावेद अख्तर यांच्यावर आगपाखड केली आहे. आता कंगनाविरोधात जावेद अख्तर कोर्टामध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे कंगना याच्यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या तक्रारीबद्दल ट्विटरवरुन माहिती दिली आहे.


Published by:
Amruta Abhyankar


First published:
November 3, 2020, 8:22 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular