Home लेटेस्ट मराठी न्यूज चौकशीत 'हे' उत्तर दिलं आणि वाधवान प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी पुन्हा कामावर रुजू,...

चौकशीत ‘हे’ उत्तर दिलं आणि वाधवान प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी पुन्हा कामावर रुजू, Controversial officer amitabh gupta in Wadhwan case resumes work mhas | News


वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य आयुक्त मनोज सौनिक यांनी काही दिवसांपूर्वीच चौकशी अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांना सादर केला होता.

मुंबई, 17 मे : लॉकडाऊनच्या काळात कपिल आणि धीरज वाधवान बंधूंसह 23 जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगीचे पत्र दिल्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. याप्रकरणी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य आयुक्त मनोज सौनिक यांनी काही दिवसांपूर्वीच चौकशी अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांना सादर केला होता.

कोणाच्या शिफारसीने नव्हे केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून वाधवान बंधूंना पत्र दिल्याची कबुली गुप्ता यांनी चौकशी समितीसमोर दिली होती. या प्रकरणी गुप्ता यांना समज देण्यात आली असून भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी ताकीद देण्यात आली.

लॉकडाऊनचे नियम मोडत गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी 8 एप्रिल रोजी कपिल वाधवान आणि त्यांच्या कुटुंबाला महाबळेश्वपर्यंत प्रवास करण्यासाठी शिफारसपत्र दिले होते. या प्रकरणी राज्य सरकारने अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवत त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र आता अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या उत्तरावर लगेच समाधानी होत त्यांनी पुन्हा कामावर रुजू होण्यास परवानगी देण्यात आली आहे.

वाधवान प्रकरणाची राज्यात झाली होती मोठी चर्चा

कपील आणि धीरज वाधवान हे हाऊसिंग फायनान्स लि.चे (DHFL)प्रमोटर्स आणि YES BANK घोटाळ्याचे आरोपी आहेत. राज्यात संचार बंदी सुरू असतानाच येस बॅक प्रकरणात जामीनावर असणारे वाधवान बंधू कुटुंबीयांसमवेत 23 लोकांना VIP पास दिला गेला. मुंबईतून खंडाळा, महाबळेश्वर प्रवास यासाठी कार पास पत्र गृह विभाग सचिव विशेष अमिताभ गुप्ता यांनी दिला होता. या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती.

संपादन – अक्षय शितोळे

First Published: May 17, 2020 11:55 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular